
अभिनेत्री उर्वशी ढोलकिया सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. ४१ वर्षीय उर्वशीने अनेक वर्षांनतंर तिच्या लग्नाबाबत एक खुलासा केला आहे. अनेक मालिकांध्ये तीने आजवर काम केलं आहे. एकता कपूरची लोकप्रिय मालिका कसौटी जिंदगी की मध्ये ती कोमोलिकाच्या भूमिकेत होती. ती भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
[read_also content=”‘या आधीपण ऑक्सिजनविना सगळे मरत होते, मग आता का आश्चर्य वाटतंय?’ अभिनेत्रीने ट्विटरवर व्यक्त केला संताप! https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/actress-richa-chaddha-tweeted-on-nashik-oxygen-leak-paste-old-news-post-viral-nrst-118260/”]
कोमोलिका या खलनायिकेच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. उर्वशीने वयाच्या १७ व्या वर्षी लग्न केले होते. तर तिला सागर आणि क्षितीज अशी दोन जुळी मुलं आहेत. ती एक सिंगल मदर आहे.
मुलाखतीत तिला लग्नाविषयी विचारलं असता तिने, ‘असं नाही की माझी वेळ निघून गेली. पण एक पॉइंटनंतर कोणत्याही गोष्टीवर मी विचार करु शकत नाही. जर माझे लग्न व्हायचे असेल तर ते कधी तरी होईलच. असं उर्वशी म्हणाली. त्यामुळे उर्वशीच्या या वक्तव्याने ती खरच लग्न करणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.