Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोड्यांच्या महिन्यात जावयाचे लाड सगळेच करतात, मात्र ‘या’ गावात जावयांना धोंडे खाऊ घातले तर होतात अपघात!

या गावात कधी काळी कोणी आपल्या जावयांना अधिक मासात धोंडे खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, असा अनुभव जुन्या काळात अनेकांना आला. यामुळे धोंडे जेवण देण्याच्या प्रथेमुळेच या दुर्घटना घडत आहेत, असा गावकऱ्यांचा समज झाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 01, 2023 | 11:23 AM
धोड्यांच्या महिन्यात जावयाचे लाड सगळेच करतात, मात्र ‘या’ गावात जावयांना धोंडे खाऊ घातले तर होतात अपघात!
Follow Us
Close
Follow Us:

तीन वर्षातून एकदा येणारा महिना म्हणजे अधिक मास (Adhik Maas 2023) यालाच धोंड्याचा महिना म्हणातात. या दिवसातं महाराष्ट्रात अनेक सण व्रत वैकल्य केलं जातात. प्रामुख्याने याचं महत्त्व म्हणजे,  जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. सासुरवाडीचे लोकं मोठ्या उत्साहात जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देतात. मात्र, अहमदनगर  मधील पिंपळगाव उज्जैनी गावात जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ न घालण्याची जुनी प्रथा आजही कायम आहे. याच्यामागे एक खास कारण सांगितलं जातं.

[read_also content=”कोण आहे मोनू मानेसर? ज्याच्या नावावर हिंदू-मुस्लिमांमध्ये पेटली ठिणगी, तोडफोड आणि जाळपोळीत तिघांचा मृत्यू https://www.navarashtra.com/crime/who-is-monu-manaser-connection-with-haryana-communal-violence-nrps-439369.html”]

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही गावाने प्रथेचे कडक पालन केले आहे. अधिक मासात प्रत्येक सासुरवाडीत जावयांना धोंडे खाऊ घालण्याची परंपरा राज्यभर पाळली जाते. जावयाला घरी बोलावून गोडधोड जेवण देऊन किमती वस्तू भेट दिली जाते. लेकीचेही यानिमित्त माहेरची मंडळी आदरातिथ्य करतात. ग्रामीण भागात अधिक महिन्याला धोंड्याचा महिनाच संबोधले जाते. त्यात जावई नवा असला तर त्याची जास्तच बडदास्त ठेवली जाते.

कुवतीप्रमाणे इतर भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, पिंपळगाव उज्जैनी गाव या परंपरेला अपवाद ठरले आहे. या गावाची अधिक मासातील प्रथा नेमकी उलटी आहे. या गावात कुणीच जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ घालण्यासाठी घरी आमंत्रित करीत नाहीत. ही प्रथा कशी पडली व या प्रथेचे नेमके कारण काय?, याची माहिती गावातील कोणालाही सांगता येत नाही इतकी ही परंपरा जुनी आहे. या गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर काही बाबी समोर आल्या.

या गावात कधी काळी कोणी आपल्या जावयांना अधिक मासात धोंडे खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, असा अनुभव जुन्या काळात अनेकांना आला. यामुळे धोंडे जेवण देण्याच्या प्रथेमुळेच या दुर्घटना घडत आहेत, असा गावकऱ्यांचा समज झाला. काहींच्या मते अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ घातल्यास गावात रोगराई सुरू झाली. यामुळे अनेकांचा जीव गेला. यामुळे गावाने जावयांना अधिक मासात धोंड्यांचे जेवण खाऊ घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली, असे सांगण्यात आले.

सरपंच म्हणतात…

आमच्या गावात अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची प्रथा आहे. सर्व गावकरी या प्रथेचे पालन करतात. ही प्रथा कधीपासून सुरु झाली हे कोणालाच ठाऊक नाही. परंपरेनुसार गावकरी त्या प्रथेचे पालन करतात. आजही ही प्रथा आम्ही पाळतो.
– मोनिका आढाव, सरपंच, पिंपळगाव उज्जैनी

Web Title: Adhik maas 2023 special ritual for son in low in maharashtra nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2023 | 11:23 AM

Topics:  

  • married woman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.