कारंजा घाडगे (Karanaja Gadge). पाच वर्षापूर्वी अस्तित्व आलेल्या नगर पंचायतीचा कार्यकाल २९ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे. यामुळे नगर पंचायतच्या पदाधिका-यांचा कार्यकाळही पूर्ण झाल्याने नगर पंचायतवर आर्वीचे उपविभागीय अधिका-यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली. ते ३० नोव्हेंबर रोजी कार्यभार सांभाळणार आहे.
२०१५ मध्ये तत्कालीन सरकारने राज्यात तालुकास्तरावर ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतमध्ये केले. ज्याची स्थापणा २४ एप्रिल २०१५ ला करण्यात आली. ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०१५ मध्ये नगरपंचायतकरिता निवडणुका झाल्या. यामध्ये कॉंग्रेसला १५, भाजपाला २ असे १७ उमेदवार निवडून आले. बहुमत मिळाल्यामुळे नगरपंचायतवर कॉग्रेसची सत्ता स्थापण झाली. कॉंग्रेसच्या बेबी कठाने यांना नगराध्यक्ष पदाचा प्रथम सन्मान मिळाला. त्यांनी ३० नोव्हेंबर २०१५ पासून नगराध्यक्षाचा कार्यकाल सांभाळला. सव्वा वर्षाचा कार्यकाल सांभाळल्यानंतर पाऊणेचार वर्षापर्यंत नगराध्यक्षपदाची सुत्रे कल्पना संजय मस्के यांच्याकडे होती.
आता नगरपंचायतचा कालावधी २९ नोव्हेंबरला संपल्यामुळे नगरपंचायतचे कार्याची सुत्रे प्रशासकाकडे सोपविण्यात आले आहे. प्रशासकपदी आर्वीचे उपविभागीय अधिका-यांची नियुक्ती जिल्हाधिका-यांनी केली आहे. ते ३० नोव्हेंबरला कार्यभार सांभाळतील. कोरोना महामारीच्या संकटामुळे निवडणुका होतील किंवा पुढे ढकलल् जातील हे सांगणे कठीण आहे. परंतू नगरपंचायतचे कामकाज रेंगाळू नये याकरिता होऊ नये याकरिता प्रशासक सध्या असलेल्या पदाधिका-यांच्या सल्ला व मार्गदर्शनाने कामकाज सांभाळतील.