आता खासगी, सरकारी शाळांमध्ये मराठी सक्तीची
देशातील सर्वोत्तम सरकारी शाळापैकी एक जवाहर नवोदय विद्यालय आहे. या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6 मधील प्रवेशासाठी असंख्य विद्यार्थ्यांकडून अर्ज केला जातो. या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 6 वी विद्यार्थ्यांना कोणतेही प्रवेश शुल्क भरावे लागत नाही. तसेच प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे राहणे, खाणे, अगदी मोफत आहे. जवाहर नवोदय विद्यालय navodaya.gov.in च्या या अधिकृत वेबसाइटवर इयत्ता 6 मधील प्रवेशासंबंधी महत्त्वाची सूचना जारी केली गेली आहे. या विद्यालयाचा प्रवेश अर्जही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाची ही प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करु शकता. त्यामुळे जर तुमच्या पाल्याला देशातील अव्वल शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश (Jawahar navodaya vidyalaya Admission)
जवाहर नवोदय विद्यालयात सहज प्रवेश मिळत नाही. यासाठी विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय समितीतर्फे घेण्यात येणारी कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. जवाहर नवोदय विद्यालयात 6 वी नंतर थेट 9वी आणि 11वीला प्रवेश मिळतो. त्यामुळे असंख्य पालक आपल्या पाल्याला इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश मिळवा यासाठी प्रयत्न करतात.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासंबंधी मार्गदर्शक तत्वे
जवाहर नवोदय विद्यालयाचे नियमाचे अतिशय काटेकोरपणे पालन होते. यासाठीच जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिसूचनेसोबतच प्रवेशासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वेही देण्यात आली आहेत. विद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी फक्त एकदाच अर्ज करु शकतो. जर प्रवेशाच्या डेटाच्या पडताळणीदरम्यान, विद्यार्थ्याने मागील वर्षांमध्येही अर्ज केल्याचे आढळल्यास, जवाहर नवोदय विद्यालय त्याची उमेदवारी नाकारू शकते.
प्रवेश फॉर्म यावर क्लिक करा आणि प्रवेश फॉर्म मिळवा.