कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकारणामध्ये चर्चांना उधाण आले आहे. राज्यामध्ये यंदाची निवडणूक जबरदस्त गाजली. राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निकालामध्ये महाविकास आघाडी सरस ठरली. महायुतीला राज्यासह देशामध्ये देखील मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता सर्वत्र राजकीय टीकेचे पोस्टर झळकत आहे. सध्या सोशल मीडियावर शरद पवार गटाचा एक पोस्टर तुफान व्हायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी शरद पवार गट फुटला. यामध्ये अजित पवार यांनी महायुतीची कास धरत पक्षावर व चिन्हावर दावा केला. पक्ष आणि चिन्ह मिळवत अजित पवार गट लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. मला जनतेचा कौल शरद पवार गटाच्या बाजूने लागले. नवीन चिन्हासह शरद पवार गट निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे सहानभूती देखील मिळाली. त्याचबरोबर प्रचारामध्ये अजित पवार गटाने शरद पवार गटावर जोरदार निशाणा देखील साधला होता. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तर पहिल्यापासून देशामध्ये चर्चेत राहिली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत झाली. यामध्ये सुप्रिया सुळे यांना तब्बल 1 लाख मताधिक्यांनी विजय झाला. यामुळे अजित पवार गटाला ही हार जिव्हारी लागली. ‘beingshrutip’ या आयडीवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आली आहे.
सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं.
IG post – पत्रकार शेखर पाटील.. pic.twitter.com/RCoBprs51g— Shruti… O+ (@beingshrutip) June 7, 2024
काय आहे नेमकं पोस्टर?
लोकसभा निवडणुकीमधील राज्यातील संपूर्ण राजकीय नाट्यांनंतर आता कार्यकर्ते पोस्टरबाजी करत आहे. बारामतीच्या विजयी उमेदवार सुप्रिया सुळे व शिरुरचे विजयी उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विजयाचे फलक संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये झळकत आहे. अगदी अमेरिकेमध्ये न्यू यॉर्क टाईम्स स्क्वेअरवर देखील सुप्रिया सुळेंचा फोटो झळकला आहे. त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये देखील असाच एक पोस्टर झळकत आहे. यामधील आशय लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरच्या दाभोळकर चौक परिसरात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. “सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…”, असा एका ओळीचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्हही आहे. रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या एका ओळीतून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीतील लढतीवरुन टीकास्त्र डागलं आहे.