Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करावी; शेखर गोरे यांचं आवाहन

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2021 | 01:43 PM
कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करावी; शेखर गोरे यांचं आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

वडूज : मागील काही दिवसांपूर्वी निवडणूक लागलेली माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रचार, गाठीभेटीमुळे चर्चेत आली असून, डबघाईला आलेल्या या बाजार समितीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला आहे. मात्र, या निवडणुकीत येणारा खर्च आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या समितीला आणखी अडचणीत टाकणारा असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन माण खटावचे शिवसेना नेते शेखर गोरे यांनी सर्वांना केलं आहे.

तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असून, कामगारांच्या पगारापासून इमारतीची दुरुस्ती विविध सोयी मिळणे अवघड होऊन ती मोडकळीस आली आहे. या बाजार समितीला उभारी देण्याची गरज आहे. सातारा जिल्ह्याबरोबरच माण खटाव तालुक्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून, काही गावे रेडझोनमध्ये आहेत. असे असतानाही माण तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लादण्यात आली आहे.

वास्तविक बाजार समिती आर्थिक अडचणीत आहे. आजपर्यंत सर्वांनीच फक्त सत्तेची चव चाखली आहे. मात्र, बाजार समिती सुस्थितीत आणण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या समितीची निवडणूक लावून तिला आणखी आर्थिक खाईत लोटण्यापेक्षा समितीच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. यासाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील राहणार आहे. सर्वच पक्षांनी अर्ज भरले असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. विरोधकांनीही याचा विचार करून कमी जास्त जागा घेऊन निर्णय घ्यावा.

माण तालुक्यातील शेतकरी कठीण परिस्थितीतून कांदा, ज्वारी, गहू, बाजरी, मूग, मका, घेवडा, भाजीपाला, फळबागांतून चांगली पीके काढत असतात. मात्र, त्यांच्या मालाला चांगले दर मिळत नाहीत. तालुक्यात बाजारपेठ नाही. मालाची विक्री करण्यासाठी परतालुक्यात, जिल्ह्यात जावे लागते. पिकांना हमीभाव नसल्याने येईल. त्या दराने मालाची विक्री करावी लागते. यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होते. माण बाजार समितीत बाजारपेठ असती, मालाची खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असते तर शेतकऱ्यांना बाहेर जावे लागले नसते. यातून बाजार समितीलाही आर्थिक सुबत्ता येऊन शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला असता.

बारामती ,फलटण , कराड , कोरेगाव , लोणंद सारख्या बाजार समित्याप्रमाणे आपली माणची बाजार समिती का नाही.कारण आजपर्यंत कोणीच बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत. माण तालुका बाजार समितीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे कोणतेच साधन नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बाजार समितीला बाहेर काढणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी या समितीच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. नक्की काय आहे या समितीत…ती ताब्यात घेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतोय. यापेक्षा निवडणूक बिनविरोध करून आसपासच्या बाजार समित्याप्रमाणे माणची बाजार समिती आदर्श बनवूयात. यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांच्या व समितीच्या हितासाठी एकत्र येत जागांवर एकमत करून बिनविरोधसाठी निर्णय घेऊयात असे आवाहनही शेखर गोरे यांनी केले आहे.

Web Title: Agricultural produce market committee should be unopposed says shekhar gore nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2021 | 01:43 PM

Topics:  

  • Agricultural Produce Market Committee

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.