Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साईबाबांच्या दर्शनासाठी असलेली ‘ती’ बंदी उठवली; पण…

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. यामध्ये जास्तीत जास्त संख्या ६५ वर्षापुढील भाविकांची असल्याचे निदर्शनास आले आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 13, 2021 | 06:26 PM
साईबाबांच्या दर्शनासाठी असलेली ‘ती’ बंदी उठवली; पण…
Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिर्डी येथील साईमंदीरात गर्भवती महिला व ६५ वर्षे वयोगटापुढील भाविकांना दर्शनासाठी करण्यात आलेली प्रवेशबंदी उठवण्यात आली असून, कोव्हीड लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच साईसमाधीचे दर्शनासाठी प्रवेश मिळेल, अशी माहिती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. यामध्ये जास्तीत जास्त संख्या ६५ वर्षापुढील भाविकांची असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या कारणास्तव राज्य सरकारने सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी बंद केली होती.

कोरोनाची पहिली लाट ओसरताच १९ नोव्हेंबर २०२० रोजी श्रीसाईमंदीराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर चार महिन्यातच कोरोनाची दुसरी लाट उसळली आणि पुन्हा दुसऱ्यांदा संस्थानच्या इतिहासात ५ एप्रिल २०२१ रोजी साईमंदीराचे दरवाजे बंद करण्यात आले.

केंद्र सरकारने कोरोनाचे लसीकरण जास्तीत जास्त वेगाने व्हावे यासाठी लसीकरणाची संख्या वाढवून देत लसीकरण मुक्त भारत या दिशेने वाटचाल सुरू करून शंभर कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे करोनापासून मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने घटस्थापनेला राज्यातील सर्व धार्मिकस्थळे दर्शनासाठी खूली करून दिली होती. परंतु, यामध्ये ६५ वर्षे वयोगटापुढील तसेच १० वर्षाच्या आतील लहान मुलांना आणि गर्भवती महिला भाविकांना साईमंदीरात दर्शनासाठी प्रवेश बंदी घालण्यात आली होती. साई संस्थानच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे. मात्र, १० वर्षाच्या आतील लहान मुलांना साई समाधी मंदिरात दर्शनासाठी अद्यापही प्रवेश बंदी असल्याचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: All devotees may take darshan of sai baba temple except who not vaccinated nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2021 | 06:26 PM

Topics:  

  • Sai Baba Temple

संबंधित बातम्या

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…
1

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.