Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरोळ येथे ‘अंकुश’च्या वतीने आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागणीवरून शिरोळमधील शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले. काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 16, 2021 | 05:47 PM
शिरोळ येथे ‘अंकुश’च्या वतीने आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:
शिरोळ : शेतकऱ्यांच्या मागणीवरून शिरोळमधील शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले. काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे.
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने आंदोलन अंकुश यांच्या वतीने केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात या करिता शिरोळच्या शिवाजी चौकात ऊसाने भरून जाणाऱ्या बैलगाड्या रोखत असताना शिरोळ पोलिसांनी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर दत्त कारखाना समर्थक शेतकऱ्यांनी आमचे नुकसान होऊ नये, यासाठी ऊसाने भरलेल्या बैलगाड्या ट्रॅक्टर  कारखान्याकडे रवाना कराव्यात, अशी भूमिका घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
उसाच्या फडातून बैलगाडी अथवा ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना पर्यायी वाहन उपलब्ध करून द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. महापूर आणि रासायनिक खतात झालेली दरवाढ मजुरीचे वाढलेले पगार यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कारखान्याने उसाच्या फडातून वाहने बाहेर काढण्याकरिता मोफत व्यवस्था करावी, अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने दत्त साखर कारखानाकडे करण्यात आली होती. यावेळी दत्त कारखान्याने या मागणीकडे दुर्लक्ष केले. यामुळे गुरुवारी दुपारी शिरोळच्या शिवाजी चौकात आंदोलन अंकुशच्या वतीने उसाने भरलेले वाहने व बैलगाडी रोखण्याचा निर्णय घेऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी ही वाहने बैलगाडी रोखत असताना शिरोळ पोलिसांनी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे, कृष्णा गावडे, भूषण गंगावणे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर उसाने भरलेल्या बैलगाड्या व वाहन कारखान्याकडे रवाना झाली. यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखानाचे समर्थक वाहतूक संघटनेचे धनाजी पाटील नरंदेकर, माजी सरपंच दरगू गावडे, नगरसेवक पंडित काळे, विठ्ठल पाटील, योगेश पुजारी, चिक्कू गुरव आदी शेतकऱ्यांनी आपली वाहन कोणी अडवू नयेत आमचं नुकसान होतं. त्यामुळे आमची  उसाने भरलेल्या बैलगाड्या व वाहने कारखानाकडे गाळपासाठी जावीत अशी भूमिका घेतली.
यामुळे आंदोलक आणि शेतकऱ्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात नंतर सर्व उसाने भरलेले वाहने बैलगाड्या पोलीस बंदोबस्तात कारखान्याकडे रवाना करण्यात आली. शिरोळमध्ये सध्या पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे
” पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा कोण प्रयत्न करत असेल  तर आंदोलन थांबणार नाही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमच्या मागण्या रास्त आहेत  यापुढे आंदोलन आणखी तीव्र करू  “
– धनाजी चुडमुंगे, प्रमुख आंदोलन अंकुश शिरोळ

Web Title: An agitation on behalf of ankush at shirol nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2021 | 05:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.