अहमदनगर : राज्य सरकारने (Maharashtra State Government) किराणा दुकानातून वाईन विक्रीला (Wine Selling Issue) परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे बेमुदत उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी 3 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांनाही पत्र पाठविले होते. मात्र, अण्णा हजारे यांच्या या पत्राला दोन्ही नेत्यांनी उत्तरच दिले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवले आहे.
बेमुदत उपोषण करणार
किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याच्या निषेधार्थ अण्णा हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत. दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तरूण पिढीवर याचा काय परिणाम होईल, याचा सरकारने विचार केला नाही. या निर्णयाबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.