फोटो सौजन्य- Official Website
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) या भारत सरकारच्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विविध विभागामध्ये 505 अप्रेंटिसशिप पद उपलब्ध आहेत. या अप्रेंटिसशिपचा कालावधी एक वर्षाचा आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे.
अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी
मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या 50 जागा, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या 50 जागा, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 17 जागा, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगच्या 7 जागा, केमिकल इंजिनिअरिंगच्या 5 जागा, मायनिंग इंजिनिअरिंगच्या 25 जागा, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या 30 जागा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगसाठी 8 आणि फार्मासिस्टसाठी 5 पदे आहेत.
नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ उमेदवार
वाणिज्य शाखेच्या ५० पदे, संगणक विज्ञान शाखेच्या ४० पदे, संगणक ॲप्लिकेशनच्या २५ पदे, व्यवसाय प्रशासनाच्या २५ पदे, भूविज्ञानाच्या ५ पदे, रसायनशास्त्राच्या ८ पदे, सूक्ष्म जीवशास्त्राच्या २ पदे.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार
मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या 45 जागा, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या 45 जागा, सिव्हिल इंजिनीअरिंगच्या 10 जागा, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या 5 जागा, मायनिंग इंजिनिअरिंगच्या 17 जागा, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या 10 जागा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम इंजिनिअरिंगच्या 10 जागा. मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी/टेक्निशियन एक्स-रेच्या 5 जागा, एक्स-रे टेक्निशियन आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या 6 जागा, फार्मासिस्टच्या 3 जागा
शैक्षणिक पात्रता निकष
विविध विभागातील अप्रेंटिसशिपसाठी वेगवेगळा शैक्षणिक पात्रता निकष आहे.
स्टायपेंड
नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 12,524 रुपये दिले जातील. अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिससाठी, दरमहा 15,028 रुपये दिले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 7 सप्टेंबर 2024.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक आणि पात्र उमेदवार NLC च्या अधिकृत वेबसाइट nlcindia.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट काढा.
सर्व आवश्यक कागदपत्रांसह या पत्त्यावर पाठवा – जनरल मॅनेजर, लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर, NLC इंडिया लिमिटेड, नेवेली – 607803.