फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इच्छेची पूर्तता लवकरच करता येणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेत अप्रेंटिस स्टाफची भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी काम करू इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे निर्देश इंडिअन ओव्हरसीज बँकेने दिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत २८ ऑगस्टला सुरु झाली असून बऱ्यापैकी उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे उमेदवारांना १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या iob.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : मजुरांचे मनरेगा कार्ड होणार रद्द? ‘या’ लोकांना कार्डद्वारे काम मिळणे बंद
इंडियन ओव्हरसीज बँकेने अप्रेंटिस स्टाफच्या एकूण ५५० जागांसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना इंडियन ओव्हरसीज बँकेने जाहीर केलेल्या काही अटी शर्तींना पात्र असणे अनिवार्य आहे. मुळात या अटी शर्ती शिक्षण तसेच वयोमर्यादे विषयक आहेत. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. त्याचबरोबर पदवीच्या शिक्षणाच्या स्ट्रीमबद्दल अशी काही ठराविक माहिती नमूद नसल्याने उमेदवार कोणत्याही स्ट्रीममधून पदवीधर असणे चालणार आहे. अधिसूचनेत वयोमर्यादे विषयक काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आहे तर कमाल वय २८ वर्षे आहे. एकंदरीत, इंडियन ओव्हरसीज बँकेने या भरती प्रक्रियेत तरुणाईवर लक्ष दिले आहे. २० वर्षे ते २८ वर्षे वय असणारे उमेदवार या भरती प्रकियेत सहभाग घेऊ शकतात आणि अर्ज करण्यास पात्र आहेत.
अर्ज करताना उमेदवारांना काही रक्कमेची अर्जशुल्क म्हणून भुगतान करावे लागणार आहे. जनरल, ओबीसी तसेच EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ९४४ रुपये भरावे लागणार आहे. तर एससी/एसटी प्रवगातील उमेदवारांना ७०८ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तेच अर्ज शुल्काची रक्कम दिव्यांग उमेदवारांसाठी ४७२ रुपये इतकी आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: