
सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज थकीत वेतनासाठी अशा वर्कर्सनी राज्य सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढला होता. या आंदोलनादरम्यान अशा वर्कर्सना पुष्पा चित्रपटाचा फिव्हर चढल्याच आढळून आंल. मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर येत्या २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्लस पोलिओ कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अशा वर्कर जिल्हाध्यक्ष पुष्पा पाटील यांनी “पुष्पा सोच के फ्लॉवर समझा क्या फायर हैं मैं “असं म्हणण्याचा मोह आवरता आला नाही. आंदोलनानंतर सर्व अशा वर्कर्सना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
एकीकडे आशा वर्कर्स दररोज गावात जाऊन लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्या आशाच्या घरात चूल पेटू शकत नाही. कारण सरकार कोणतीही सुविधा देत नाही. तुटपुंज्या वेतनावर घराचा गाडा हाकणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अशा परिस्थितीत अनेकदा आशा वर्कर्स यांनी आंदोलन केलीत. मात्र सरकारला काही अद्याप जाग आलेली दिसत नाही आहे. आता याचं पुढचं पाऊल म्हणून मागण्या मान्य न झाल्यास २७ ब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्लस पोलिओ कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
[read_also content=”आधी फडणवीस आता नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेस आंदोलन; राणे समर्थक आक्रमक https://www.navarashtra.com/latest-news/first-fadnavis-now-congress-agitation-outside-narayan-ranes-house-rane-supporters-aggressive-nrps-238678.html”]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या सूक्ष्म नियोजनासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या सूक्ष्म नियोजनासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता हा संसर्ग वाढू नये, बालकांना याचा त्रास होवू नये याकरिता आवश्यक सर्व दक्षता घेवून पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे पार पडेल यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करत आहे.
[read_also content=”अखेर जंबो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी 89 पानांची तक्रार दाखल केलीच; ठाकरेंनी पेशंटच्या जीवाशी खेळून कोरोड रुपयांचा खेळ केल्याचा आरोप https://www.navarashtra.com/latest-news/89-page-complaint-of-kirit-somaiya-in-jumbo-covid-center-scam-238703.html”]