Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : आशा, गटप्रवर्तकांचा धडकला ‘दे धडक’ मोर्चा; दिवाळीनंतर बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Nagpur News : नागपुरात आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस, मानधन कपात रद्द करणे आणि शासकीय सेवेत समायोजनाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर 'दे धडक' मोर्चा काढला. दिवाळीनंतर उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास हिवाळी अधिवेशनात महामुक्कामी मोर्चाचा इशारा दिला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 06, 2026 | 03:23 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी बोनस आणि भाऊबीज भेट तातडीने देण्याची मागणी
  • मानधन कपात रद्द करून किमान २६ हजार वेतन द्या
  • मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन; महामुक्कामी मोर्चाचा इशारा
Nagpur News : दिवाळी बोनस, कपात केलेले मानधन पूर्ववत करणे आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घेणे, अशा विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी नागपुरात आंदोलनाचे हत्यार उपसले. आयटकच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयावर विदर्भव्यापी ‘दे धडक’ मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

दिवाळी बोनस आणि भाऊबीज भेट तातडीने देण्याची मागणी

आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना तातडीने दिवाळी बोनस देण्यात यावा, तसेच सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची भाऊबीज भेट विनाविलंब मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सणासुदीच्या काळातही आर्थिक प्रश्न प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय केंद्र; कृषी केंद्रासाठी 880 कोटी मंजूर

मानधन कपात रद्द करून किमान २६ हजार वेतन द्या

केंद्र सरकारने पीआयपीअंतर्गत मानधनात केलेली कपात मागे घेऊन पूर्वीप्रमाणे मानधन सुरू करावे, अशी संघटनेची मागणी आहे. सर्व कर्मचाऱ्यांना किमान २६ हजार रुपये मासिक वेतन लागू करून कर्मचारी दर्जा द्यावा, तसेच गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, असा आग्रह धरण्यात आला.

याशिवाय निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे, पगारी रजा मंजूर करणे, ऑनलाइन कामांची सक्ती थांबवणे, विनामोबदला कामे बंद करणे आणि केंद्र-राज्याचा मोबदला दरमहा नियमित देण्याची मागणीही करण्यात आली.

Nagpur News : कचरा प्रक्रिया केंद्रात घडला अपघात; ट्रॉमल मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन; महामुक्कामी मोर्चाचा इशारा

आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी शिष्टमंडळाशी चर्चा केली. आशा व गटप्रवर्तकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिवाळीनंतर तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आयटक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही दिल्या.

या वेळी गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते. मोर्चाचे नेतृत्व आयटकचे प्रदेश सरचिटणीस श्याम काळे, उपाध्यक्ष विनोद झोडगे-पाटील, शिवकुमार गणवीर, मंगला पांडे, शालू कुथे, नयन गायकवाड आणि रामचंद्र पाटील यांनी केले. दरम्यान, दिवाळीनंतरच्या बैठकीत मागण्या मार्गी न लागल्यास हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी ‘महामुक्कामी मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.

Web Title: Nagpur asha workers protest fadnavis diwali bonus maharashtra cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Asha Workers
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत
1

Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत

Chandrapur News: चंद्रपुरात भेसळखोरांवर FDA चा दणका! १० आस्थापनांचे परवाने निलंबित, ५१ दुकानांना सुधारणा नोटीस
2

Chandrapur News: चंद्रपुरात भेसळखोरांवर FDA चा दणका! १० आस्थापनांचे परवाने निलंबित, ५१ दुकानांना सुधारणा नोटीस

Raigad News: तीन वर्षे काम करूनही पगार नाही! रायगडच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार वादात, चौकशीची मागणी
3

Raigad News: तीन वर्षे काम करूनही पगार नाही! रायगडच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार वादात, चौकशीची मागणी

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळीत घरात सुख-समृद्धी नांदावी असं वाटतंय? लक्ष्मीपूजनाचे हे 7 नियम नक्की पाळा!
4

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळीत घरात सुख-समृद्धी नांदावी असं वाटतंय? लक्ष्मीपूजनाचे हे 7 नियम नक्की पाळा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.