Bangladesh team refused to go to mosque in Gwalior
IND vs BAN T20I Series : भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 मालिकेतील पहिला सामना गेल्या काल (06 ऑक्टोबर) ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना जिंकला. आता ग्वाल्हेरमधून समोर आलेल्या एका बातमीत एक रोचक खुलासा झाला आहे, ज्यामध्ये बांगलादेशच्या टीमने नमाजसाठी मशिदीत जाण्यास नकार दिला आणि नंतर हॉटेलमध्येच नमाज अदा केल्याचे सांगण्यात आले. नेमकं काय होते कारण जाणून घेऊया.
बांगलादेश खेळाडूंनी केली हॉटेलमध्ये नमाज अदा
ग्वाल्हेर झोनचे महानिरीक्षक अरविंद सक्सेना यांनी पीटीआयशी फोनवर बोलताना माहिती दिली की, बांगलादेशचा संघ मशिदी शहरातील मोती मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी गेला नाही, परंतु संघाच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला. अरविंद सक्सेना म्हणाले, आम्ही मोती मशिदीभोवती विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली होती, परंतु बांगलादेशचा संघ आला नाही. त्यांच्या भेटीत अडथळा आणण्यासाठी कोणत्याही संघटनेकडून कॉल आलेला नाही. तुम्हाला सांगतो की, मशीद शहरातील फुलबाग भागात आहे, जी टीम हॉटेलपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर होती.
हिंदू महासभेने दिली ‘बंद’ची हाक
ऑगस्टमध्ये बांगलादेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. माजी पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळून गेल्या होत्या. यानंतर बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी सामन्याच्या दिवशी ‘ग्वाल्हेर बंद’ची हाक दिली होती. हिंदू महासभेने बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत रविवारच्या सामना रद्द करण्याची मागणी केली होती. हिंदू महासभेला इतर काही संघटनांचीसुद्धा साथ मिळाली होती. हिंदू महासभेने बुधवारी तीव्र आंदोलन केलं होतं. मात्र, या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा वाढवण्यात आली होती.
मशिदीत न जाण्याचा निर्णय
मशिदीत न जाण्याचा निर्णय संघाच्या व्यवस्थापन स्तरावर घेण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय शहार काझी हॉटेलमध्ये पोहोचले आणि बांगलादेशी क्रिकेटपटूंना 1 ते 2:30 च्या दरम्यान नमाज अदा केल्याची पुष्टीही अधिकाऱ्याने केली.
माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर रंगला सामना
हॉटेल आणि माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममधील अंतर सुमारे 23 किमी आहे आणि खेळाडू त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरक्षिततेच्या दरम्यान फिरत होते. पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “अभ्यागत संघाला केवळ 3 किमी सुरक्षा देणे आमच्या बाजूने समस्या नव्हती. 2,500 पोलीस तैनात करण्यात आले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, भारत-बांग्लादेश सामन्याच्या दिवशी रविवारी ग्वाल्हेरमध्ये 2,500 पोलीस आधीच तैनात करण्यात आले होते.