Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?

Nepal MI-6 Spy Lord Ashcroft : माजी रॉ एजंट लकी बिश्त यांनी दावा केला आहे की ब्रिटिश गुप्तचर संस्था MI-6 चा एजंट लॉर्ड अ‍ॅशक्रॉफ्ट नेपाळमध्ये आहे. 5 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी ही एक मोठी राजनैतिक घडामोड आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 01, 2026 | 07:09 PM
nepal spy war mi 6 lord ashcroft lucky bisht raw agent claim black jet pokhara 2026

nepal spy war mi 6 lord ashcroft lucky bisht raw agent claim black jet pokhara 2026

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये MI-6 सक्रिय?
  • पोखरा विमानतळावर ‘ब्लॅक जेट’चे गूढ
  • निवडणुकीपूर्वी मोठा कट?

Lucky Bisht RAW agent Nepal claim 2026 : भारताचा शेजारी देश नेपाळ (Nepal) सध्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांच्या शीतयुद्धाचा आखाडा बनला आहे. ५ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीपूर्वी नेपाळमध्ये अशा काही हालचाली घडत आहेत ज्यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ (RAW) चे माजी एजंट लकी बिश्त यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून नेपाळमध्ये ब्रिटीश गुप्तचर संस्था MI-6 चा वावर वाढल्याचा दावा केला आहे.

पोखरा विमानतळावरील ‘ब्लॅक जेट’चे रहस्य

लकी बिश्त यांच्या दाव्यानुसार, नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या तीन-चार दिवसांपासून (२८ जानेवारीपासून) एक खाजगी “ब्लॅक जेट” उभे आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या विमानाची कोणतीही अधिकृत नोंद किंवा माहिती नेपाळ सरकारकडे उपलब्ध नाही. पोखरा विमानतळ हे चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमांतर्गत बनवले गेले असून त्यावर चीनचे मोठे नियंत्रण आहे. अशा परिस्थितीत चीनच्या संमतीशिवाय तिथे अशा विमानाचे आगमन होणे अशक्य असल्याचे बिश्त यांनी म्हटले आहे. या विमानाने ब्रिटीश अब्जाधीश आणि राजकारणी लॉर्ड अ‍ॅशक्रॉफ्ट नेपाळमध्ये आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : युद्धाची ठिणगी महाभयानक आगीकडे! खमानेईंचा ट्रम्पना अंतिम इशारा; ‘हल्ला केला तर पूर्ण पश्चिम आशिया पेटवून देऊ’

लॉर्ड अ‍ॅशक्रॉफ्ट आणि MI-6 कनेक्शन

लॉर्ड अ‍ॅशक्रॉफ्ट हे केवळ एक उद्योगपती नसून त्यांचे ब्रिटीश गुप्तचर संस्था MI-6 शी अत्यंत जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. ते जगभरातील निवडणुकांमध्ये निधी पुरवण्यासाठी आणि राजकीय समीकरणे बदलण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. लकी बिश्त यांच्या मते, अ‍ॅशक्रॉफ्ट सध्या नेपाळमधील कम्युनिस्ट नेते केपी शर्मा ओली यांच्या संपर्कात आहेत. ज्या ओलींना नेपाळच्या जनतेने लोकशाही मार्गाने सत्तेतून पायउतार केले होते, त्यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी हे ‘बाहेरचे’ लोक प्रयत्न करत असल्याचा संशय बिश्त यांनी व्यक्त केला आहे.

28 जनवरी 2026 से पोखरा इंटरनेशनल एयरपोर्ट पर एक प्राइवेट ब्लैक जेट खड़ा है, और हैरानी की बात ये है कि नेपाल सरकार को इसकी कोई आधिकारिक जानकारी नहीं। आज भी पोखरा इंटरनेशनल एयरपोर्ट का पूरा कंट्रोल चीन के पास है। इसी जेट से ब्रिटेन के बिज़नेसमैन लॉर्ड अशक्रॉफ्ट नेपाल आए हैं… pic.twitter.com/AKh1PSEzmp — Lucky Bisht (@iamluckybisht) February 1, 2026

credit – social media and Twitter

नेपाळ निवडणुकीत ‘विदेशी’ हस्तक्षेप?

नेपाळमध्ये ५ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना गुप्तपणे निधी पुरवणे आणि सत्तेचे फेरबदल करणे यासाठी लॉर्ड अ‍ॅशक्रॉफ्ट नेपाळ दौऱ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. “नेपाळच्या पोखरा विमानतळावर विमानाची हालचाल होते आणि सरकारला पत्ता नसतो, हे नेपाळच्या सार्वभौमत्वासाठी धोकादायक आहे,” असे लकी बिश्त यांनी स्पष्टपणे बजावले आहे. यापूर्वीही बिश्त यांनी नेपाळमधील सत्तापालट आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत केलेली भाकिते खरी ठरली आहेत, त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Visit : Epstein Files मध्ये PM Modi यांचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे ‘त्या’ ईमेलचे सत्य

काय आहे भारतासाठी चिंता?

नेपाळमध्ये जर चीन आणि ब्रिटनच्या मदतीने पुन्हा एकदा भारतविरोधी सरकार सत्तेवर आले, तर ते भारताच्या सुरक्षेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. केपी शर्मा ओली यांचा कल नेहमीच चीनकडे राहिला आहे. अशात MI-6 आणि चीन एकत्र येऊन नेपाळमध्ये कोणताही मोठा राजकीय कट रचत आहेत का? हा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: माजी RAW एजंट लकी बिश्त यांनी काय दावा केला आहे?

    Ans: लकी बिश्त यांनी दावा केला आहे की ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा MI-6 शी संबंधित लॉर्ड अ‍ॅशक्रॉफ्ट एका खाजगी ब्लॅक जेटने नेपाळमध्ये आले असून ते आगामी निवडणुकीत हस्तक्षेप करत आहेत.

  • Que: पोखरा विमानतळावरील विमानाबाबत वाद काय आहे?

    Ans: २८ जानेवारीपासून पोखरा विमानतळावर उभे असलेल्या खाजगी विमानाची नेपाळ सरकारला कोणतीही अधिकृत माहिती नाही, असा आरोप बिश्त यांनी केला आहे.

  • Que: नेपाळमध्ये निवडणुका कधी होणार आहेत?

    Ans: नेपाळमध्ये ५ मार्च २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान होणार आहे.

Web Title: Nepal spy war mi 6 lord ashcroft lucky bisht raw agent claim black jet pokhara 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • China
  • india
  • nepal
  • RAW
  • World War 3

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
2

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.