बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiyaa 3 )च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता अलीकडेच त्याने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. कार्तिकने एक नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. रेंज रोव्हर एसव्ही खरेदी केली असून त्याची किंमत 6 कोटी रुपये आहे. गुरुवारी, कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, ज्यामध्ये तो त्याच्या नवीन कारची पूजा करताना आणि स्वागत करताना दिसत होता.
[read_also content=”दिग्दर्शक रामगोपाल वर्माची राजकारणात एन्ट्री; दाक्षिणात्य सुपरस्टारला निवडणुकीच्या रिंगणात देणार आव्हान https://www.navarashtra.com/movies/ram-gopal-varma-join-political-party-contest-election-from-pithapuram-in-andhra-pradesh-nrps-nrps-515485.html”]
त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आलिशान कारच्या ट्रंकमध्ये आनंदाने बसलेला दिसत आहे. कार्तिकसोबत त्याचा पाळीव कुत्रा देखील होता. यावेळी तो आरामदायक शर्ट, पांढरी पँट आणि कोल्हापुरी चप्पल परिधान केलेल्या कॅज्युअल लूकमध्ये दिसला. नवीन कारचा फोटो शेअर करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमची रांग थोडी वाढली आहे.’ मिनी माथूर आणि डब्बू रतनानी यांच्यासह त्यांच्या उद्योगातील अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या नवीन कारबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
कार्तिक आर्यनकडे BMW 5 Series 520d, McLaren GT, Mini Cooper S, Lamborghini Urus Capsule आणि Porsche 718 Boxster यासह अनेक आलिशान कार आहेत. इंडस्ट्रीतील स्टार्ससह सर्व चाहते कार्तिकचे नवीन कारसाठी अभिनंदन करत आहेत.
कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर कार्तिक आर्यन लवकरच कबीर खानच्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून ते आता पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे. कार्तिक सध्या ‘भूल भुलैया 3’ चे शूटिंग करत आहे, ज्यामध्ये तृप्ती डिमरी आणि विद्या बालन दिसणार आहेत.