Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Politics: ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय..; बिहारच्या बड्या नेत्याचा आरोपाने खळबळ

महिनाभरापूर्वी मला वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली होती. पण फक्त एका महिन्यातच ती सुरक्षा काढून घेण्यात आली. बिहारचे दोन प्रमुख नेते आणि दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या हत्येचा कट रचत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 26, 2025 | 11:00 AM
Bihar Politics:

Bihar Politics:

Follow Us
Close
Follow Us:
  • पप्पू यादव यांची सुरक्षा काढून घेण्यात आली
  • पप्पू यादव यांच्या हत्येचा कट
  • संजय झा आणि दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Bihar Politics: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राजकारण तापू लागलं आहे. अशातच बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर आरोप केले आहेत. एक महिन्यापूर्वी त्यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आलीअसून बिहारचे दोन प्रमुख नेते आणि दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप पप्पू यादव यांनी केला आहे. यादव यांच्या या दाव्यामुळे बिहारमध्ये एकच खळबळ माजली आहे.

यासंदर्भात बोलताना खासदार यादव म्हणाले की, महिनाभरापूर्वी मला वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली होती. पण फक्त एका महिन्यातच ती सुरक्षा काढून घेण्यात आली. बिहारचे दोन प्रमुख नेते आणि दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या हत्येचा कट रचत आहेत. जाणीवपूर्वक माझी सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. पण जर माझ्यासोबत काही घटना घडली, तर हे दोन प्रमुख नेते आणि दोन वरिष्ठ अधिकारी त्यासाठी जबाबदार असतील.” यादव यांच्या या आरोपांनंतर राजकीय व सुरक्षा प्रशासनात तणाव निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासनाकडून या गंभीर आरोपांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा

याचवेळी पप्पू यादव यांनी जनता दल (युनायटेड) चे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्यावर थेट आरोपही केले आहेत. संजय झा हे या कटाच्या केंद्रस्थानी आहेत. संजय झा यांनी सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्यांचा पक्ष विकला आहे. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या राजकीय संधींचा ते व्यापार करत आहेत.

 भाजपच्या नेत्याला बिहारचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही

खासदार पप्पू यादव यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. “मी कोणत्याही किंमतीत भाजपच्या नेत्याला बिहारचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, हे संजय झा यांना माहित आहे. त्यामुळे माझ्या जीवाशी तडजोड केली जात आहे.सीमांचल, कोसी आणि मिथिलामध्ये भाजपला आव्हान देणारा मी एकमेव नेता असल्यामुळेच माझ्याविरुद्ध हे षड्यंत्र रचले जात आहे.

Constipation Remedy: सडून राहिलेले शौच पडेल त्वरीत बाहेर, 3 स्टेप रूटीनमुळे सकाळीच होईल पोट साफ

दरम्यान, यावेळी पप्पू यादव यांनी सुरक्षा यंत्रणांना त्यांची सुरक्षा पुन्हा देण्याचेही आवाहन केलं आहे. त्यांनी सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगून संपूर्ण सुरक्षा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पप्पू यादव यांच्या विधानामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. जेडीयू आणि भाजपच्या छावण्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, राजकीय  पारा वाढला आहे. पप्पू यादव यांच्या आरोपांमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष आणखी वाढला आहे. सरकार त्यांची सुरक्षा पुनर्संचयित करेल का हे पाहणे बाकी आहे.

 

Web Title: Bihar politics a conspiracy is being hatched to kill me bihars big leaders allegation creates a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • bihar assembly election 2025

संबंधित बातम्या

Bihar Politics: नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा: भाजपच्या गोटात पडद्यामागील घडामोडींना वेग
1

Bihar Politics: नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा: भाजपच्या गोटात पडद्यामागील घडामोडींना वेग

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
2

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

Bihar Election 2025: ‘काल एका मुलीचा अपमान…’; अवघ्या २४ तासात रोहिणी आचार्य यांच्या दुसऱ्या पोस्टने खळबळ
3

Bihar Election 2025: ‘काल एका मुलीचा अपमान…’; अवघ्या २४ तासात रोहिणी आचार्य यांच्या दुसऱ्या पोस्टने खळबळ

Explainer: RJDपेक्षा कमी मते मिळवूनही भाजपने जास्त जागा कशा जिंकल्या? कसे आहे निवडणुकीचे समीकरण
4

Explainer: RJDपेक्षा कमी मते मिळवूनही भाजपने जास्त जागा कशा जिंकल्या? कसे आहे निवडणुकीचे समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.