Frank Kameny (फ्रँक कॅमिनी) Google Doodle: Google ने आज अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ, दुसऱ्या महायुद्धातील दिग्गज आणि समलैंगिक अधिकार कार्यकर्ते फ्रँक कॅमिनी यांना अनोखी श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. गुगलने आपल्या होमपेजवर एक डूडल तयार केले आहे, ज्यात कॅमिनी यांना एक रंगीत हार परिधान केला असल्याचे दाखविण्यात आले आहे.
जून महिन्याच्या पदार्पणातच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची असा दुर्मिळ योगायोग गुगलने साधत असतानाच जागतिक स्तरावर आजचा दिवस ‘प्राइझ मंथ’ म्हणूनही साजरा करण्यात येतो. Google ने कॅमिनी यांना युएस एलजीबीटीक्यू अधिकार आंदोलनांचे प्रमुख प्रणेत्याच्या रुपात सादर केले आहे आणि दशकांच्या प्रगतीसाठी साहसपूर्वक मार्ग प्रशस्त केल्याप्रकरणी त्यांना धन्यवादही दिले आहेत.
[read_also content=”दैनंदिन राशीभविष्य : ०२ जून २०२१; मिथुन राशीच्या लोकांना मिळणार कष्टाचे पूर्ण परिणाम; जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य https://www.navarashtra.com/latest-news/daily-horoscope-02-june-2021-gemini-people-will-get-the-full-result-of-hard-work-know-your-horoscope-for-today-nrvb-136777.html”]
कॅमिनी यांचा जन्म २१ मे, १९२५ रोजी क्वीन्स, न्यूयॉर्क येथे झाला होता. त्यांनी भौतिक शास्त्राचे अध्ययन करण्यासाठी अवघ्या १५ वर्षांचे असतानाच प्रवेश घेतला होता. कॅमिनी यांनी हार्वर्ड विद्यापीठात खगोल शास्त्रात डॉक्टरेट मिळविण्याआधी सर्वप्रथम दुसऱ्या महायुद्धाच्या लढाईत सहभाग घेतला होता.
१९५७ मध्ये, ते आर्मी मॅप सर्व्हिस सोबतच एक खगोलशास्त्रज्ञही झाले, पण सरकारद्वारे LGBTQ समुदायातील सदस्यांच्या सांघिक रोजगाराला बाधा आणल्याप्रकरणी काही दिवसांतच त्यांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. कॅमिनी यांनी सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली आणि १९६१ मध्ये, अमेरिका सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा समलैंगिक अधिकार याचिका दाखल केली.
[read_also content=”त्यांनी उपचारासाठी घरे गहाण ठेवली, दागिने विकले, कर्जे काढली; कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांनी कथन केली परिस्थिती https://www.navarashtra.com/latest-news/they-mortgaged-homes-for-treatment-sold-jewelry-took-out-loans-the-families-of-the-corona-victims-stated-the-situation-nrvb-136818.html”]