मुंबई : अनधिकृत शाळांची संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट आहे की, काय असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.
कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अनधिकृत ठरल्याची बाब
राज्यात शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १३०० पैकी ८०० शाळा या कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अनधिकृत ठरल्याची बाब निदर्शनास आल्याबाबत तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. याबाबत उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, ६६१ खासगी शाळा या अनधिकृत असल्याचे दिसून आल्या असून, अशा अनधिकृत शाळांवर कारवाई, दंड आणि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
या मागे असलेल्या रॅकेटचा पदार्फाश करण्याची गरज
यावर उपप्रश्न विचारताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी म्हणाले की, या शाळा अनधिकृत कशा ठरल्या त्याची कारणे कोणती आहेत, यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या शाळा अनधिकृत ठरल्या आहेत. याबाबत पुन्हा उपप्रश्न विचारताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी शाळांच्या परवानग्यांमध्ये दिसून येणारी ही दिरंगाई पाहता यामध्ये कोणते रॅकेट काम करतेय का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मान्य केले.
शाळाबाह्य मुलांसाठी सिग्नल शाळेसारख्या शाळा सुरू करण्याची मागणी
शाळाबाह्य मुलांसाठी ठाण्यात सुरु झालेल्या सिग्नल शाळेसारख्या शाळा सुरु करा, अशी मागणीदेखील आमदार अॅड. आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्नावर बोलताना केली. याबाबत उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, सन 2022-23 मध्ये राज्यात आढळून आलेल्या 9305 शाळाबाह्य बालकांपैकी 9004 बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात सरकारला यश आले आहे.
दिनांक 30 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार तीन ते अठरा वयोगटांतील शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन झीरो ड्रॉप आउट’ या नावाने 5 जुलै ते 20 जुलै 2022 या कालावधीमध्ये मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेत सन 2022- 23 मध्ये राज्यात 4,650 मुले व 4,675 मुली असे एकूण 9305 बालके शाळाबाह्य आढळून आली होती.
Web Title: Bjp mp adv ashish shelar demanded that they say probe through sit regarding unauthorized schools nryb