100 रुपयांहुन कमी किमतीचे BSNL रिचार्ज प्लॅन्स, डेटासह कॉलिंग बेनेफिट्सही उपलब्ध
खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक युजर्स सरकारी दूरसंचार कंपनी म्हणजेच बीएसएनएलकडे वळले. येत्या काळात कंपनीने अनेक नवीन युजर्स कमवले. वाढते युजर्स बघता बीएसएनएल आपल्या सर्व्हिसवर आणखीन भर देत आहे. कंपनी लवकरच 5G सेवा सुरु करणार आहे. बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये युजर्सच्या गरजेनुसार परवडणाऱ्या अनेक योजना आहेत. 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत डेटा, कॉलिंग आणि अतिरिक्त फायदे देणाऱ्या अनेक योजना आहेत. जे लोक कमी खर्चात सिम ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी स्वस्त प्लॅन शोधत आहेत त्यांच्यासाठी आम्ही सांगत असलेले हे प्लॅन्स एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. चला, BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या 5 रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हे आहेत BSNL चे 100 रुपयांहुन कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन्स
TV जाल विसरून! परवडणाऱ्या किमतीत आलाय Smart Projector, 120 इंचाच्या स्क्रीनमध्ये मिळेल थिएटरची मजा
BSNL चा 58 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जर तुम्हाला परवडणारा डेटा सोल्यूशन प्लॅन हवा असेल तर बीएसएनएलचा 58 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. यामध्ये, हाय-स्पीड डेटा 7 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 2 GB डेटा मिळतो. तथापि, कंपनी प्लॅनमध्ये कॉल आणि एसएमएस सर्व्हिस देत नाही. हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे ज्यांना कमी किंमतीत शॉर्ट टर्म डेटा प्लॅन हवा आहे.
87 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन
यामध्ये, 14 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 14 GB डेटा आणला जातो, म्हणजेच दररोज एक GB. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळतो. या बजेट-फ्रेंडली प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटा दोन्हीचा कॉम्बो उपलब्ध आहे.
94 रुपयांचा व्हॅल्यू फॉर मनी रिचार्ज प्लॅन
बीएसएनएल प्लॅनमध्ये तुम्हाला 94 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये एकूण 90 GB डेटा रोलआउट करण्यात आला आहे, म्हणजेच प्रत्येक दिवसासाठी 3 GB डेटा. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. यामध्ये लोकल आणि नॅशनल कॉलिंगसाठी 200 मिनिटे उपलब्ध आहेत.
WhatsApp Christmas Scam: मेसेज पाठवून अकाउंट हॅक आहेत स्कमर्स, व्हॉट्सॲप युजर्ससाठी अलर्ट
97 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगचे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये दररोज 2 GB डेटा मिळतो. डेली डेटा पॅक संपल्यानंतरही, युजर्स 40Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरू शकतात. यामध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा लाभही मिळतो.
98 रुपयांच्या रिचार्जमध्ये कोणते बेनेफिट्स?
यामध्ये एकूण 36 GB डेटा 18 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रोलआउट केला जातो. रोजच्या प्लानमध्ये यूजर्सला 2 GB डेटा मिळतो. जर रोजचा डेटा पॅक संपला असेल तर स्पीड 40Kbps राहील. या स्पीडसह, 18 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा उपलब्ध आहे.