वाशिम (Washim). वाशिम जिल्ह्यातून (Washim district) जाणाऱ्या नागपूर- मुंबई (Nagpur-Mumbai) द्रुतगती मार्गावर लक्झरी बस उलटून (A luxury bus overturned) अपघात (luxury bus accident) झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. (20 others were injured in the accident) जिल्ह्यातील चांडस जवळ ही घटना घडली. बस चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटल्याची माहिती आहे.
[read_also content=”क्रौर्याची परिसीमा ! खंडणीत मागितले मुंडके; खंडणीत मागितले मुंडके; १५ वर्षांच्या मुलाच्या अपहरणानंतर मृतदेह फेकून दिला https://www.navarashtra.com/latest-news/the-limits-of-cruelty-heads-demanded-in-ransom-kidnapping-and-murder-of-a-15-year-old-boy-nrat-140962.html”]
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून यवतमाळ जिल्ह्यातील पुसदकडे जाणारी एम एच 29 एम 8282 क्रमांकाची लक्झरी बस चांडस जवळ उलटली. या अपघातामध्ये 25 वर्षांच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील वानखडे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या अपघातमधील जखमींना मालेगाव आणि वाशिम येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तसेच, रस्त्यावर उलटलेली बस हटविण्यात आली आहे. या बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे पुसद भागातील कामगार होते. पुण्याहून घरी परतत असताना हा अपघात झाला.