Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दापोलीत बस कंडक्टरने काढली विद्यार्थिनीची छेड; त्यानंतर तिच्या मैत्रिणींनी जे काही केलं…

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे. या घटना कमी होताना दिसून येत नाहीयेत. बदलापूर प्रकरण, पुण्यातील वानवडी अत्याचार प्रकरण, बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरण आणि राज्यभरात अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2024 | 08:43 PM
पोलिस कर्मचाऱ्याकडून इसमास बेदम मारहाण

पोलिस कर्मचाऱ्याकडून इसमास बेदम मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे. या घटना कमी होताना दिसून येत नाहीयेत. बदलापूर प्रकरण, पुण्यातील वानवडी अत्याचार प्रकरण, बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरण आणि राज्यभरात अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. या प्रकरणी पोलीस देखील गंभीर असून, अशा प्रकरणात कठोर कारवाई केली जात आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे. फक्त यात मुलीनी छेड काढणाऱ्याला धडा शिकवला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी एक कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर या कॉलेजच्या मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने केलेल्या कृत्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. एका मुलीची छेड काढणाऱ्याला मुलीच्या मैत्रिणींनी त्या कंडक्टरला चांगलाच धुतला आहे. दापोली येथे बसमध्ये बसलेल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीची छेड काढल्यामुळे बसमधील इतर विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत बस कंडक्टरची धुलाई केली आहे.

बस कंडक्टरने विद्यार्थिनीची छेड काढल्यानंतर बसमधील इतर विद्यार्थिनींनी कंडक्टरला चोप चोप चोपले आहे. एका मुलीने चक्क चप्पल हाती घेऊन कंडक्टरला चांगले सुनावले आणि धोपटले देखील आहे. मुलींचा हा रौद्र रूप पाहून बसच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमा झाली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरळ होताना पाहायला मिळतो आहे. तर या प्रकरणी कंडक्टरविरुद्ध दाभोळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यात स्कूल बसमध्ये लहान मुलीवर अत्याचार

लहान मुलींवर अत्याचार झालेले बदलापूर प्रकरण ताजे असताना पुण्यामध्ये देखील असाच संतापजनक प्रकार घडला आहे. वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील 8 वर्षांच्या दोन मुलींवर व्हॅनमध्ये व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे पुण्यामध्ये वातावरण तापले आहे. पालकांनी रोष व्यक्त केला असून या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Bus conductor molested college girl then her freinds beaten to conductor in dapoli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 08:43 PM

Topics:  

  • Dapoli

संबंधित बातम्या

Dapoli : निकृष्ट बांधकामाची करवत, धोकादायक पुलामुळे शिरखल परिसरात भीतीचं वातावरण
1

Dapoli : निकृष्ट बांधकामाची करवत, धोकादायक पुलामुळे शिरखल परिसरात भीतीचं वातावरण

Dapoli : शेतकऱ्यांना मदत मिळावी, गोंधळेकरांची मागणी !
2

Dapoli : शेतकऱ्यांना मदत मिळावी, गोंधळेकरांची मागणी !

Dapoli :पश्चिमात्य संस्कृतीमुळे रानफळांचा विसर, स्थानिकांना रोजगारासाठी फळ प्रक्रिया उद्योगावर भर
3

Dapoli :पश्चिमात्य संस्कृतीमुळे रानफळांचा विसर, स्थानिकांना रोजगारासाठी फळ प्रक्रिया उद्योगावर भर

Ratnagiri News: दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरेंच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर; राजकीय वर्तुळात खळबळ
4

Ratnagiri News: दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरेंच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर; राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.