
नवी दिल्लीःकोरोना साथीच्या(Corona) काळात मोदी सरकार लवकरच आणखी एक मदत पॅकेज जाहीर करण्याच्या विचारात आहे. याचा फायदा लहान आणि मध्यमवर्गीय कंपन्यांना होणार आहे. तसेच पर्यटन, विमानचालन आणि प्रवासी उद्योगाशी संबंधित लोकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. याबाबत वित्त मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. मंत्रालयाचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे. त्यामुळे सरकार लवकरच असे प्रोत्साहनपर पॅकेज(Central Governments package) जाहीर करेल. आताच याचे नियोजन केले जात आहे. याबाबत कोणतीही निश्चित मुदत सांगितली गेलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
[read_also content=”कळंबा मध्यवर्ती कारागृहातील २ कोरोनाबाधित कैद्यांनी कोविड सेंटरमधून ठोकली धूम, अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या https://www.navarashtra.com/latest-news/police-arrested-2-corona-positive-criminals-who-ran-away-from-covid-center-nrsr-133741.html”]
देशातील विविध राज्यांत लॉकडाऊन लावल्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांचे बरेच नुकसान झाले आहे. देशातील विविध राज्यांत लॉकडाऊन लावल्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे अशा भागांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सरकार मागील वेळेप्रमाणे मदत पॅकेज जाहीर करू शकते.
वस्तुतः अधिक नुकसान झालेल्या हॉटेल इंडस्ट्री, ट्रॅव्हल इंडस्ट्रीसह अनेक उद्योगांनी सरकारकडे मदत पॅकेजची मागणी केली आहे. त्याचबरोबर उद्योग मंडळाच्या संघटनेने सरकारला कोविड- १९ साथीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधामुळे कुटीर, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) संरचित मदत पॅकेजही मागवले आहे. ट्रॅक शॉपर्सना दिले जाणारे आर्थिक लाभ आणि सवलतींची व्याप्ती वाढविली पाहिजे.