Chakamakfame Daya Nayak shifted to Tadkafadki at Gondia; Another Thane officer transferred to Gadchiroli
ठाणे : चकमकफेम आणि मुंबईच्या जुहू एटीएस पोलीस निरीक्षक दया नायक यांची गोंदियात तर ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांची गडचिरोली परिक्षेत्रात तडकाफडकी बदली करण्यात आल्याने एकाच खळबळ उडालेली आहे. सदरचे बदलीचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक अस्थापना कुलवंत सारंगल यांनी लेखी स्वरुपात दिले असून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आणि असलेल्या ठिकाणी कार्यंमुक्त अरण्याचे आदेश दिले आहेत. सदरच्या बदल्या या प्रशासकीय असल्याचे म्हंटले आहे. मात्र या दोन्ही अधिकारी यांच्या बदलीने एकच चर्चा सुरु आहे.
चकमकफेम दया नायक हे निलंबित झाल्यानंतर पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून जुहू दहशतवादी पथकात त्यांची नियुक्ती करण्यात आली. जुहू दहशतवादी पथकाचा दया नायक यांनी वर्षभरात हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली होती. दरम्यान अंबानी प्रकरणात आणि मनसुख प्रकरणात पोलीस दलातील अधिकारी यांच्या बदलीचा धडाका सुरु केला आहे. या प्रकरणाच्या तपासात नियुक्त केलेल्या पथकात दयानायक यांच्या पथकाचाही समावेश होता.
शिवाय जुहू दहशतवादी पथकाचे नेतृत्व दयानायक यांनी केले होते. मात्र या बदल्याच्या यादीत दया नायक यांच्या नावाला जोडून त्यांची तडकाफडकी बदली गोंदियात केल्याने पोलीस वर्तुळात एकच चर्चेला उधान आले आहे. तर दुसरीकडे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी चांगली कामगिरी केली.
मात्र, त्यांची बदलीही अंबानी स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणी सुरु असलेल्या बदली सत्रात तडकाफडकी झालेल्या बदलीने आता एकच चर्चा सुरु झाली आहे. पोलीस दलाच्या बदली गडचिरोली किंवा नक्षलवादी विभागात करण्यात आल्यास शिक्षा समजले जाते. तर मग दया नायक आणि राजकुमार कोथमिरे यांना कुठली शिक्षा अशा अंगाने चर्चेला उधाण आलेले आहे.
[read_also content=”मराठा आरक्षण निर्णयाच्या पार्श्वभुमीवर गृहमंत्री सतर्क; पोलीस मुख्यालयात जावून घेतला सद्यस्थितीचा आढावा https://www.navarashtra.com/latest-news/home-minister-alerted-against-maratha-reservation-decision-went-to-the-police-headquarters-to-review-the-current-situation-nrvk-125322.html”]