पंगा क्वीन कंगना रनौत (kangana Ranaut)नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि खासगी जीवनामुळे चर्चेत पाहायला मिळते. त्याचबरोबर बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यामधील भांडण हे चांगलाच गाजलं होतं आणि कोणापासून लपलं देखील नाही. अनेकवेळा कंगना कोणत्या ना कोणत्या निमित्ताने करणवर धारदार शब्दांचा वर्षाव करत असते. दोघांमध्ये नेहमीच वाद पाहायला मिळाला आहे. परंतु आता हा वाद मिटणार असल्याचं दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये करणने कंगनाच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले आहे. करण जोहरने नुकतीच एक मुलाखत दिली आहे त्यामध्ये त्याने कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटाविषयी असे काही सांगितले आहे.
करण जोहर आणि कंगना रनौत या दोघांमधील वाद हा मनोरंजन इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा वाद आहे. परंतु अलीकडेच करणने दिलेल्या एका विधानावरून आता या वादाला पूर्णविराम मिळत असल्याचे दिसत आहे. करणच्या या विधानावरून आता चाहतेही तेच गृहीत धरत आहेत. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेव्हा करणला राजकीय कथेवर आधारित चित्रपटाच्या संदर्भात विचारण्यात आले तेव्हा त्याने कंगना रनौतच्या चित्रपटाचे नाव सांगितले. करण जोहरला विचारण्यात आले की, तो कधी राजकीय घटनेवर आधारित चित्रपट बनवणार आहे का? यावर करण जोहर म्हणाला, सध्या इमर्जन्सी चित्रपट बनवला जात आहे आणि तो पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
करण जोहर याने कंगनासोबतच्या वादाच्या जवळपास ६ वर्षानंतर असे विधान केले आहे. कंगना जेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण जोहरचा लोकप्रिय शो कॉफी विथ करण (Coffee with Karan) या चॅट शोमध्ये गेली होती तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली. जेव्हा कंगना या शो मध्ये गेली होती तेव्हा कंगनाने करणला चित्रपट माफिया म्हटले होते, तसेच त्याच्यावर घराणेशाही पसरवल्याचा आरोपही केला होता. यानंतरच सोशल मीडियावर या दोघांचे युद्ध सुरु झाले होते. हे दोघेही अनेकदा एकमेकांवर आरोप करताना दिसले. नुकताच प्रदर्शित झालेला रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेच्या वेळी कंगनाने करणवर बॉक्स ऑफिसवर खरेदी केल्याचा आरोपही केला होता. यानंतर कंगनाने करणकडे निवृत्ती घेण्याची मागणीही केली होती. सुशांत सिंग राजपूतच्या(Sushant singh rajput) मृत्यूला करण जबाबदार असल्याचा आरोपही अभिनेत्रीने केला आहे.