Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योगनगरीतील बांधकामे गुंठेवारीनुसार नियमित करता येणार नाहीत – आयुक्त राजेश पाटील

राज्य सरकारने सन २०१७ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम दुरूस्ती करून अवैध बांधकामाचे नियमितीकरण करण्यास मान्यता दिली होती. तथापि, त्यामधील अटी व शर्तींचे अनुपालन करणे आणि त्यासाठी लागणारे शुल्क भरणे नागरिकांना अवाजवी वाटल्याने त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

  • By Navarashtra News Network
Updated On: Jul 26, 2021 | 11:27 AM
उद्योगनगरीतील बांधकामे गुंठेवारीनुसार नियमित करता येणार नाहीत – आयुक्त राजेश पाटील
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: पिंपरी – चिंचवड शहरात नागरिकांनी छोटे-छोटे भुखंड खरेदी करून अवैधपणे बहुमजली बांधकामे केली आहेत. बहूतांशी ठिकाणी रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे रितसर बांधकाम परवानगी देणे शक्य नसल्याने ही बांधकामे गुंठेवारी अधिनियमानुसार नियमित करता येण्यासारखी नाहीत, असा स्पष्ट अभिप्राय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविला आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील निवासी घरांचे उल्हासनगर महापालिकेच्या धर्तीवर गुंठेवारी पद्धतीने नियमितीकरण करावे. तसेच निवासी घरांवरील शास्तीकर सरसकट संपूर्ण माफ करावा, अशी मागणी शिवसेना माजी खासदार गजानन बाबर यांनी १५ सप्टेंबर २०२० रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. बाबर यांनी केलेल्या या मागण्यांसंदर्भात नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी दिलीप वणिरे यांनी १५ जून २०२१ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेचा अभिप्राय सरकारला तात्काळ पाठविण्याबाबत आदेश दिले होते. या पत्राला महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी २२ जुलै २०२१ रोजीच्या पत्राद्वारे अभिप्राय दिला आहे.

[read_also content=”पुणेदुर्दैवी घटना! धबधब्याच्या पाण्यात बुडून बाप लेकांचा मृत्यू https://www.navarashtra.com/latest-news/unfortunate-event-father-leka-dies-after-drowning-in-waterfall-water-nrab-160972.html”]

या अभिप्रायात पाटील यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने सन २०१७ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम दुरूस्ती करून अवैध बांधकामाचे नियमितीकरण करण्यास मान्यता दिली होती. तथापि, त्यामधील अटी व शर्तींचे अनुपालन करणे आणि त्यासाठी लागणारे शुल्क भरणे नागरिकांना अवाजवी वाटल्याने त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता राज्य सरकारने महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ ला मुदतवाढ दिली आहे. तथापि, गुंठेवारी बांधकामे नियमित करण्याबाबत नियम, पद्धती व शुल्क याबाबत महापालिकेने २७ एप्रिल २०२१ नुसार राज्य सरकारचे मार्गदर्शन मागवले आहे. हे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.

महापालिका हद्दीत नागरिकांनी ५० ते १५० चौरस मीटर आकाराचे छोटे भुखंड खरेदी केले. कुटूंब संख्येनुसार, जादा चटई क्षेत्र निर्देशांक वापरून अवैधपणे बहुमजली बांधकामे केली आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ता अरूंद आहे. त्यामुळे रितसर बांधकाम परवानगी देणे शक्य नाही. ही बांधकामे गुंठेवारी अधिनियम अथवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार नियमित करता येण्यासारखी नाहीत. या वसाहतींमधील बांधकामे नियमित करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या धर्तीवर बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतल्यास नियमिती करणाबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.

[blockquote content=”पिंपरी – चिंचवड शहराची ओळख उद्योगनगरी म्हणून असून लोकसंख्या सुमारे २५ लाखांच्या आसपास आहे. शहरात १,७५,००० बांधकामे विनापरवाना आहेत. कष्टकरी, कामगार, मजूर, टपरीधारक, माथाडी कामगार, किरकोळ विक्रेते, सर्वसामान्य नागरिक, श्रमिक , मध्यमवर्गीय, रिक्षाचालक, ड्रायव्हर, भाजीपाला विक्रेते, सुरक्षारक्षक अशा सर्वसामान्य नागरिकांनी गुंठा – अर्धा गुंठा जागा घेऊन उपजिविकेसाठी घरे बांधली आहेत. गोरगरिब नागरिकांना केंद्रबिंदू मानून या सर्वांना न्याय देण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे.पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील निवासी घरांचे उल्हासनगरच्या धर्तीवर परवडण्याजोगे शुल्क आकारून नियमितीकरण करावे, अशी शिवसेनेची मागणी आहे.” ” pic=”” name=”- गजानन बाबर (शिवसेना माजी खासदार)”]

Web Title: Constructions in industrial city cannot be regularized according to gunthewari commissioner rajesh patil nrpd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2021 | 11:27 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.