अकोला (Akola). कोरोनामुळे (Corona) अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. (has deprived many of their jobs) पोटपाणी भरण्यासाठी अनेकांना मन मारून न आवडत्या क्षेत्रात काम करावे लागत आहे; परंतु अकोल्यातील एक शिक्षण सध्या घरोघरी सिलेंडर पोहोचविण्याचे काम करीत आहे. खडका येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर सहायक शिक्षक (an Assistant Teacher at a Zilla Parishad school in Khadka) म्हणून सेवा देणारे संघदास वानखडे (Sanghdas Wankhade) असे त्यांचे नाव आहे. मागील 15 दिवसांपासून ते घरोघरी सिलेंडर पोहोचविण्याचे काम करीत आहे.
[read_also content=”व्हिडिओ व्हायरल/ वाघाच्या जोडीला पर्यटकाने अडविले; वाहनचालकांच्या लागल्या लांबच लांब रांगा; वननियमांचे उल्लंघन केल्याचा युवकावर ठपका https://www.navarashtra.com/latest-news/video-goes-viral-tiger-pair-stopped-by-tourist-long-queues-of-motorists-youth-reprimanded-for-violating-forest-rules-nrat-nrat-136444.html”]
अकोला जिल्ह्यातल्या खडका येथील जिल्हा परिषद शाळेवर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संघदास वानखडे शिक्षक आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ते सिलिंडर घरोघरी पोहचवण्याचं काम करत आहेत. यातून जी मजुरी मिळेल ती मजुरांसाठी ऐन संकटकाळात देवदुतासारख्या धावून येणाऱ्या सोनू सूद याच्या हवाली ते करणा आहेत. मजुरांना कामाच्या तुलनेत अत्यंत कमी मोबदला मिळतो. त्यात पोट भरणं कठीण असताना, मुलांचं शिक्षण आणि इतर गोष्टी दूरच राहिल्या. संघदास यांनी मजुरांच्या वस्तीत राहिल्यानं त्यांचे हाल जवळून अनुभवले आहेत. म्हणून मजुरी करून किती पैसा मिळतो हे सर्वांना कळावं म्हणून ते हे काम करत आहेत.
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजू तायडे या त्यांच्या मित्राच्या सिलेंडरच्या गाडीवर ते काम करतायत. कधी कधी चार पाच मजली अपार्टमेंटमध्ये त्यांना सिलिंडर पोहोचवावे लागते. दररोज तीस-पंचवीस सिलेंडर पोहोचवावे लागतात. मजुरांना अनेकदा कामच नसतं. अशी वेळ आपल्यावर आल्यावर काय? मी एवढा शिकलेला मजुरी कशी करू अशा विचाराने कदाचित आपल्याला नैराश्य येईल म्हणून झेपेल ते काम करून संकटाचे दिवस काढायचे यासाठी त्यांनी मेहनतीचं काम करण्याचा निर्णय घेतला.
संघदास वानखडे यांना यातून मिळालेली कमाई सोनू सूद यांना द्यायची आहे. सोनू सूद यांनी मजुरांना प्रचंड मदत केली आहे. त्यांच्यासाठी ते देवदूत बनले. अशा लोकांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. तसंच लोकांनी मजुरांना सहकार्य करावे हा संदेश देण्यासाठी ते हे काम करत असल्याचं सांगतात. या शिक्षकाने मजुरांना मदत करता यावी यासाठी अनोखं पाऊल उचलल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.