Pakistan vs Bangladesh Test Series 2024
Pakistan vs Bangladesh Test Series : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सामना रंगणार आहे. यामध्ये पाकिस्तानने अधिकाधिक प्रेक्षक यावेत यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. तिकिटाचे रेट कमीत कमी केले आहेत. पीसीबीने मैदानाच्या आत जास्तीत जास्त जागा भरण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत फक्त 50 रुपये आहे आणि स्टेडियममधील ठिकाणांनुसार किंमत वाढेल. कराची येथील नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये तिकिटाची किंमत 50 रुपयांपासून सुरू होते. तर प्रीमियम अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी कमाल तिकिटाची किंमत 2.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
दुपारच्या जेवणाची व चहाची सोय
दुसरीकडे, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना तिथे खेळवला जाणार आहे. येथे तिकिटाची किंमत 200 रुपयांपासून सुरू होते. चाहत्यांसाठी गॅलरी पासची सुविधाही देण्यात आली आहे. गॅलरी पासची किंमत 2,800 रुपये ठेवण्यात आली असून तो खरेदी करणाऱ्या व्यक्तीला जेवण आणि चहाची सुविधाही दिली जाणार आहे.
🏏 Pakistan squad getting ready for the ICC World Test Championship fixtures against Bangladesh 🏟️#PAKvBAN pic.twitter.com/Wr4sAcN4a4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 12, 2024
प्लॅटिनम बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 12,500 रुपये मोजावे लागतील. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला रावळपिंडी स्टेडियममध्ये सर्व सुविधांचा आनंद घ्यायचा असेल तर त्याला एका सीटसाठी 2 लाख रुपये मोजावे लागतील.
विश्वचषकानंतर पाकिस्तानची पहिली मालिका
2024 च्या T20 विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी संघ सुपर-8 मध्येही पोहोचू शकला नाही. आयसीसी स्पर्धेनंतर पाकिस्तान संघ पहिली मोठी मालिका खेळणार आहे. दरम्यान, बांगलादेशचा संघ त्यांच्या देशात सुरू असलेल्या आंदोलनामुळे नियोजित वेळापत्रकाच्या आधी पाकिस्तानात येणार आहे. बांगलादेश संघाचे खेळाडू १३ ऑगस्टला लाहोरमध्ये उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.