फोटो सौजन्य - istock
सध्या देशात ऑनलाईन फसवूणकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागरिकांना घाबरवून आणि दहशत निर्माण करून त्यांची फसवणूक केली जाते. अनेकदा घाबरलेले नागरिक ऑनलाईन फसवणूकीला बळी पडतात. ज्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ऑनलाईन स्कॅम, खोटे कॉल, बनावट मॅसेज, बनावट वेबसाईट, बनावट ॲप यामुळे नागरिकांची फसवणूक केली जाते. अनेकदा नागरिक अशा खोट्या मॅसेज आणि वेबसाईटला बळी पडतात. ज्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
हेदेखील वाचा – तुमचा X अकाऊंंटवरील डेटा वापरून AI ला दिली जातेय ट्रेनिंग; आत्ताच तुमच्या अकाऊंटमध्ये करा ‘ही’ सेटिंग
असाच एक प्रकार बिहारमध्ये देखील घडला आहे. TRAI अधिकाऱ्याच्या नावाने खोटा फोन करून बिहारमधील एका व्यवसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे. या व्यवसायिकाला तब्बल 90 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दिनेश कुमार असं या व्यवसायिकाचं नाव आहे. त्याला एक फोन आला होता. फोनवरील व्यक्तिने आपण TRAI अधिकारी बोलत असल्याचा दावा केला. अधिकाऱ्याला फोन करणाऱ्या व्यक्तीने दिनेशला सांगितलं की, तुमच्या नंबरवरून दुसरं सिम जारी करण्यात आलं आहे. तसेच तुमच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या बँक अकाऊंटमध्ये गैरव्यवहार सुरु आहेत. हा गुन्हा असून याप्रकरणी तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
हेदेखील वाचा – लवकरच लाँच होणार UPI ची नवीन सेवा; ऑनलाईन पेमेंट होणार अधिक सोप
यानंतर फोनवरील व्यक्तिने पोलीस स्टेशनला कॉल ट्रान्सफर करण्याचं नाटक केलं. यानंतर दिनेशला सांगण्यात आलं की,
आधार कार्ड वापरून कॅनरा बँकेत तुमच्या नावाने खातं उघडण्यात आलं आहे आणि त्यात बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत. यासंदर्भात तुम्हाला टिळक नगर पोलीस ठाण्यात हजर राहावं लागेल. यावेळी स्कॅमर्सनी दिनेशला एक लिंक पाठवली. लिंकवर क्लिक करताच दिनेशच्या अकाऊंटमधून 90 लाख रुपये गायब झाले. आपली फसवूणक झाल्याचं लक्षात येताच दिनेशने पोलिसांत धाव घेतली. त्याने सायबर स्कॅमर विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.