नागपूर (Nagpur). केंद्र आणि राज्य शासनाच्या (the Central and State Governments) आरोग्य मंत्रालयाने (The Ministry of Health of the Central) प्रत्येक राज्यस्तरावर कोरोना लसिकरणाचा धडाका (the corona vaccination) सुरू केला. मात्र, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यात शनिवारी 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळल्याची नोंद आहे. नागपुरात 13 आणि ग्रामीण भागात 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात शनिवारी कोेरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू (patients died of corona) झालेला नाही.
[read_also content=”मलकापूर/ वहिनी वहिनी म्हणतं विवाहितेवर जडलं प्रेम, एकेदिवशी घरात शिरून केला तिचा गेम; ६ वर्षांच्या चिमुकल्याचीही…. https://www.navarashtra.com/latest-news/says-vahini-her-love-to-marriage-woman-she-murdered-her-by-giving-poision-at-home-one-day-nrat-153624.html”]
शहरात आजच्या कोरोना पॉझिटिव्ह आकडेवारीमुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 35 हजार 134 वर पोहोचली. नागपुरात एकूण 20 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले. शहरात 4445 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. नागपूर शहरात सध्याच्या स्थितीला 327 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
[read_also content=”धक्कादायक! निवडणुकीत प्रतिस्पर्धी नको होता; सामाजिक कार्यकर्त्याची ५ लाखांची सुपारी देऊन हत्या https://www.navarashtra.com/latest-news/wanted-a-rival-in-the-election-assassination-of-a-social-worker-by-betel-nut-nrat-153655.html”]
आरोग्य विभागामार्फत शनिवारी 5986 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील 4445 आणि ग्रामीण भागातील 1541 जणांचा समावेश आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या 26 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आजच्या कोरोना रुग्णांच्य आकडेवारीमुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 लाख 77 हजार 315 वर पोहोचली आहे.