सरकारचा एक निर्णय! ...अन् हे तीन शेअर्स तुफान तेजीत, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.९) जीएसटी कौन्सिलची ५४ वी बैठक पार पडली. या बैठकीत जीएसटी कौन्सिलने नमकीनवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज भारतीय शेअर बाजारात त्याच्या थेट परिणाम पाहायला मिळाला आहे. नमकीनवरील जीएसटी दरात घट झाल्यानंतर मंगळवारी (ता.१०) गोपाल स्नॅक्स लिमिटेड, बिकाजी फूड्स लिमिटेड आणि प्रताप स्नॅक्स लिमिटेडचे शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.९) झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सोमवारी नमकीन स्नॅक्सवरील दर आधीच्या 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी तेजी नोंदवली गेली आहे.
वाढलेत ‘या’ कंपन्यांचे शेअर्स
बिकाजी फूड्सचे शेअर आज 7.6 टक्के वाढून 899 रुपयांवर व्यवहार करत आहेत. या वर्षी आतापर्यंत बिकाजी फूड्सच्या शेअर्समध्ये सुमारे 60 टक्के वाढ झाली आहे. तर प्रताप स्नॅक्सचे शेअर्स आज 8 टक्क्यांपर्यंत वाढून 877.10 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले आहेत. तर या वर्षी आतापर्यंत शेअर्स 23 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. गोपाल स्नॅक्सचे शेअर्स आज 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 354 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
हे देखील वाचा – ‘ही’ आहे भारतातील सर्वाधिक विकली जाणारी व्हिस्की; किंमत वाचून चाट पडाल…!
काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन
जीएसटी परिषदेची सोमवारी 54 वी बैठक झाली. बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत पत्रकारांना माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नमकीन किंवा तळलेले किंवा न शिजवलेले स्नॅक पेलेट्स, ज्यांना एक्सट्रूझन प्रक्रियेद्वारे उत्पादित केले जाते त्यावरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे.
परिणामी, जीएसटी दर घटवल्यामुळे हे पदार्थ स्वस्त होणार आहेत. याशिवाय जीएसटी कौन्सिलने कर्करोगाच्या औषधांवरील जीएसटी दर 12 वरून 5 टक्के आणि स्नॅक्सवरील जीएसटी 18 वरून 12 टक्के कमी केला आहे. याशिवाय जीएसटी कौन्सिलने परदेशी विमान कंपन्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. तसेच, कार सीटवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)