मुंबई : आज सकाळी हार्बर लाईनवरील (Harbour line Railway ) रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. या घटनेची चौकशी केली असता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही समाजकंटकांनी सिग्नलच्या वायर,लोकेशन बॉक्स तोडल्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याची माहिती आहे. आता सध्या मात्र सकाळपासूनच लोकल सेवा सुरळीत सुरु झाली आहे.
पनवेल ते सीएसटी (Panvel To CSMT दरम्यान आज सकाळी लोकल गाड्या उशीरानं धावत होत्या. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणा बिघडलेल्याने वाहतूक सेवेवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत होतं. आता बिघडलेली सिग्नल यंत्रणा दुरूस्त केल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली आहे. मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लोकल सेवा सुरळीत झाल्याची माहिती दिली आहे. लोकल सेवा सुरळीत मात्र उशीराने सुरु आहे. दरम्यान, त्यांनी ट्वीट करत या बिघाडाचे कारणही सांगितले आहे. काही समाजकंटकांनी सिग्नलच्या वायर,लोकेशन बॉक्स तोडल्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
[read_also content=”वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार, पुन्हा जेल की बेल? आजच्या सुनावणीकडे लक्ष https://www.navarashtra.com/maharashtra/lawyer-gunaratna-sadavarte-police-custody-will-end-today-jail-or-bell-again-268260.html”]
[read_also content=”मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर https://www.navarashtra.com/maharashtra/minister-dhananjay-munde-suffers-heart-attack-condition-stable-nrps-268244.html”]