dhantrayodashi 2021
अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला धनतेरस अर्थात धनत्रयोदशी(Dhantrayodashi 2021) हा सण येतो. देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे.(Diwali 2021) हा दिवस धन्वंतरी देवांचा जन्मदिवस असून त्यांच्या पूजेबरोबरच या दिवशी कुबेर, लक्ष्मी, गणेश आणि यम यांचीही पूजा केली जाते. यावर्षी धनत्रयोदशी २ नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी घरच्या घरी छोटी पूजा कशी करावी ? हे जाणून घेऊयात.
[read_also content=”नरक चतुर्दशी साजरी करण्यामागे ‘हे’ आहे कारण, अधिक माहिती जाणून घ्या https://www.navarashtra.com/latest-news/diwali-special-article-about-narak-chaturdashi-2021-198188.html”]
धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नियमित कामातून निवृत्त होऊन पूजेची तयारी करा. घराच्या ईशान्य दिशेलाच पूजा करा. पूजेच्या वेळी आपले तोंड उत्तर, पूर्व किंवा उत्तर दिशेला असले पाहिजे. पूजेच्या वेळी सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू या पंचदेवांची पूजा करा. पूजेच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन पूजा करावी. पूजा करताना कोणताही आवाज करू नका.
धन्वंतरी देवाची षोडशोपचारे म्हणजेच १६ क्रियांसह पूजा करा. पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, दागिने, गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य, आचमन, तांबूल, स्तवपाठ, तर्पण आणि नमस्कार. पूजेच्या शेवटी सांगता सिद्धीसाठी दक्षिणाही अर्पण करावी.
यानंतर धन्वंतरी देवासमोर उदबत्ती, दिवा लावावा. त्यानंतर त्यांच्या कपाळावर हळदी कुंकू, चंदन आणि तांदूळ लावा. त्यानंतर त्यांना हार आणि फुले अर्पण करा. पूजेमध्ये अनामिका (करंगळीजवळील अनामिका) चंदन, कुंकुम, अबीर, गुलाल, हळद इ. लावण्यासाठी वापरावी. तसेच वरील षोडशोपचारातील सर्व पदार्थांसह पूजा करावी. पूजा केल्यानंतर प्रसाद किंवा नैवेद्य (भोग) अर्पण करा. नैवेद्यात मीठ, मिरची, तेल वापरत नाही हे लक्षात ठेवा. प्रत्येक ताटावर तुळशीचे पान ठेवले जाते.शेवटी त्यांची आरती करून नैवेद्य दाखवून पूजेची सांगता होते. मुख्य पूजेनंतर आता प्रदोष काळात मुख्य गेट किंवा अंगणात दिवे लावा. तसेच यमाच्या नावाने दिवा लावावा. रात्री घराच्या कानाकोपऱ्यात दिवे लावा.