Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकासकामे करा, पण फसवणूक नको : दिलीप सोपल

बार्शी शहरात सध्या आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून विविध प्रकारची खोटी आश्वासने देऊन फसवणुकीचा प्रकार सुरू आहेत. यापासून नागरिकांनी सावध राहावे. शासकीय नियम पाहता प्लॉटमधील खुली जागा त्या प्लॉटधारकांच्या सोसायटीच्या मालकीचे असतात.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 27, 2021 | 02:32 PM
विकासकामे करा, पण फसवणूक नको : दिलीप सोपल
Follow Us
Follow Us:

बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी शहरात सध्या आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून विविध प्रकारची खोटी आश्वासने देऊन फसवणुकीचा प्रकार सुरू आहेत. यापासून नागरिकांनी सावध राहावे. शासकीय नियम पाहता प्लॉटमधील खुली जागा त्या प्लॉटधारकांच्या सोसायटीच्या मालकीचे असतात. त्यामुळे कोणीही फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) व विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

सोपल यांनी सांगितले की, बार्शीमध्ये निवडणुका जवळ आल्या की खोट्या आश्वासनांची खैरात होत असते. याचाच भाग म्हणून गेल्या काही दिवसापासून बार्शी शहरातील लेआउटमधील खुली जागा विविध समाजाला देतो, आमदार कोट्यातून समाज मंदिर बांधून देतो, या नावाखाली भूमिपूजन कार्यक्रम सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोपल यांनी पत्रकार परिषदेत शासकीय नियमांचे, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सर्व नगरपालिकांना लेआउटमधील ओपन स्पेसवर शासकीय निधीतून कामे प्रस्तावित न करण्याबाबतचे दिलेले पत्र तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचेकडून ओपन स्पेस संदर्भाने केलेले ठराव रद्द करण्याच्या कार्यवाहीचे निकाल सादर केले.

माजी मंत्री सोपल म्हणाले, विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा पाऊस ही नियमित बाब झालेली आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या गोष्टींचे आश्वासने देऊन फक्त मतावर डोळा ठेवणे हे या मंडळींचे काम आहे. यापूर्वी देखील नगरपालिका निवडणुकीत या अनुषंगाने घरपट्टीवरील व्याज माफ करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देऊन ते पाळू शकले नाहीत.

नियमित पाणीपुरवठा आश्वासन ज्यांना पाळता आलेले नाही. ती मंडळी समाजाला खुला प्लॉट देण्याच्या नावाखाली सक्रिय झालेली आहेत. परंतु कोणत्याही समाजाने, यासंदर्भात जे शासकीय नियम आहेत जे सर्वांवर बंधनकारक आहेत ते पाहता कृपया आपली फसगत होऊ नये, यासाठी या माध्यमातून आपणास आवाहन करण्यात येते की संबंधित सत्ताधाऱ्यांनी ज्या समाजाला जे ओपन स्पेस देण्याचे आव्हान केले आहे. ते ओपन स्पेस दिल्या संदर्भात कोणताही शासकीय पत्रव्यवहार त्यांनी दाखवावा, त्या ठिकाणी शासकीय योजनेतून मिळालेली मंजुरी जिल्हाधिकारी अथवा जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या स्वाक्षरी दाखवावी.

Web Title: Do development work but do not cheat says dilip sopal nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2021 | 02:32 PM

Topics:  

  • Dilip Sopal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.