तुम्ही अंघोळ करताना लघवी करता का? असा प्रश्न जर कुणी विचारला तर तुम्ही त्याच्यावर हसाल, कदाचित त्याला मूर्खातही काढाल. हा प्रश्न कितीही खाजगी असला तरी प्रत्यक्षात तुम्ही ते अनेक वेळा करता. बहुतेक लोकांना आंघोळ करताना बाथरूममध्ये लघवी करायला आवडते. खरं तर, जेव्हा तुमचे संपूर्ण शरीर बराच वेळ थंड पाण्यात राहते, तेव्हा मूत्राशयावर दबाव येतो आणि यामुळे मूत्र प्रणाली सक्रिय होते. अशा परिस्थितीत तुम्ही आळसामुळे इतरत्र जाण्याऐवजी अंघोळ करताना हे करणे पसंत करता. आंघोळ करताना लघवी करण्याचे आहेत असे जर तुम्हाला सांगितले तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.
तुमच्या लघवीमध्ये कमी प्रमाणात बॅक्टेरिया असतात : आंघोळ करताना लघवी करणे शरीरासाठी चांगले आहे. जर तुम्हाला आंघोळ करताना लघवी आली असेल आणि तुम्ही ती तेथेच केली तर त्यामुळे तुमच्या मूत्राशयाला आराम मिळतो. या व्यतिरिक्त, असे कारण देखील आहे की लघवीमध्ये संसर्ग होण्यासाठी धोकादायक बॅक्टेरिया नसतात. लघवीमध्ये यूरिया असतो, जो एक संयुग आहे आणि अनेक त्वचाचेसाठी लाभदायी असतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की पायांवर लघवी केल्याने बुरशीजन्य संसर्गापासून बचाव किंवा उपचार करण्यात मदत होऊ शकते.
तुमची लघवी जास्तीत जास्त पाण्याने बनलेली असते: निरोगी लोकांमध्ये, मूत्र जास्त पाणी, इलेक्ट्रोलाइट्स आणि युरियापासून बनलेले असते, जे आपल्या शरीराला हानिकारक नसते. तसेच, आंघोळ करताना तुम्ही लघवी करता तेव्हा ते पाण्याने वाहून जाते आणि तुम्हाला किंवा इतर कोणालाही हानी पोहचवत नाही.
[read_also content=”डोळ्याची नजर वाढविण्याचे जबरदस्त उपाय; प्रत्येकाने नक्की करावा https://www.navarashtra.com/latest-news/a-great-way-to-enhance-your-eyesight-everyone-should-do-exactly-that-nrng-199914.html”]
मासिक पाळीमध्ये मिळतो आराम : मासिक पाळीमध्ये जर तुम्ही आंघोळ करताना कोमट पाणी वापरत असाल तर या काळात लघवी केल्याने तुम्हाला मासिक पाळीच्या भयंकर वेदनांपासून आराम मिळू शकतो. यासह, ते रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करते.