Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२६ वर्षांपासूनचा प्रलंबित कौटुंबिक वाद मिटला तडजोडीने

तब्बल २६ वर्षापेक्षा अधिककाळ चालू असलेला दिवाणी व फौजदारी वाद शनिवारी १२ मार्च राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपुष्टात आला. पोटगी मिळावी यासाठी १९९६ मध्ये दाखल केलेला दावा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकालात काढण्यात आला. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2022 | 03:54 PM
२६ वर्षांपासूनचा प्रलंबित कौटुंबिक वाद मिटला तडजोडीने
Follow Us
Follow Us:

माळशिरस : तब्बल २६ वर्षापेक्षा अधिककाळ चालू असलेला दिवाणी व फौजदारी वाद शनिवारी १२ मार्च राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपुष्टात आला. पोटगी मिळावी यासाठी १९९६ मध्ये दाखल केलेला दावा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकालात काढण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेषाबाई सुखदेव माने यांनी तिच्या पतीविरोधात १९९६ साली पोटगी मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. माळशिरस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात कलम १२५ प्रमाणे अर्ज मंजूर झाला व त्याप्रमाणे सुखदेव हे पोटगीची रक्कम भरत होते.

कालांतराने वयोमानानुसार सुखदेव यांना पोटगीची रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या आदेशाविरोधात कलम १२७ नुसार २००२ मध्ये अर्ज दाखल केला, तसेच स्वत: ला पोटगी मिळणेसाठी मुले तानाजी व पांडुरंग यांच्याविरोधात फौजदारी पोटगी अर्ज दाखल केला. सदरचे दोन्ही अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस कोर्टात प्रलंबित होते.

दरम्यानच्या काळात पांडुरंग शिंदे यांनी वडिलांविरोधात वाटपाचा दावा केला होता. त्याचा निकाल लागल्यानंतर २०१७ साली जिल्हा न्यायालय माळशिरस येथे अपील दाखल करण्यात आले होते. तसेच शेषाबाई शिंदे यांच्या दिवाणी पोटगीच्या दाव्यातील निकाल सुखदेव यांनी जिल्हा न्यायालयात आव्हानित केला होता. सदरचे दोन्ही अपील व प्रलंबित असलेलेले पोटगीचे अर्ज राष्ट्रीय लोकाअदालतीत ठेवून तडजोड केली.

पक्षकारांनी निकालाबाबत व्यक्त केले समाधान

न्यायाधीश एम. एन. पाटील, व्ही. ए. कारंडे, जी.एम. नदाफ, पी. पी कुलकर्णी यांनी सदर प्रकरणे लोकअदालतमध्ये मिटविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच दोन्हीं बाजूचे वकील

ॲड. डी.ए. फडे, बी.आर. भिलारे यांनी सहकार्य केले. अशा प्रकारे १९९६ पासून प्रलंबित असलेले पोटगी अर्ज व दिवाणी अपीले तडजोडीमध्ये निकाली करण्यात आले. पक्षकारांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त केले.

Web Title: Domestic dispute solved in lok adalat nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2022 | 03:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.