Video: थेट मुख्यमंत्रीच जाणार 'लाडक्या बहिणीं'च्या घरी; शिवसेनेकडून केला जाणार राज्यभर प्रचार
राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला १,५०० रूपये जमा केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात सरकारकडून मेळावे घेतले जात आहेत. तर आता या योजनेचा प्रचार शिवसेनेकडून देखील केला जाणार आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. आता लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि आढावा घेण्यासाठी शिवसेना मैदानात उतरणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी त्याचा शिवसेनेकडून प्रचार केला जाणार आहे. अजूनही अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लाडकी बहीण योजेनची जाहिरात केली गेल्यानंतर महायुतीत धूसफूस पाहायला मिळाली. मात्र आता या वादावर पडदा पडला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष या योजनेचा प्रचार करणार आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्याशी ऑनलाईन बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुटुंबभेट योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शिवसेनेचे राज्यभरातील पदाधिकारी रोज १५ कुटुंबाना भेटून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही अशा कुटुंबाचा आढावा व योजना कधी मिळू शकेल यासाठी मदत करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंद स्वतः या योजनेचा आरंभ करणार आहेत. एकनाथ शिंदे हे स्वतःच उद्या १५ कुटुंबाना भेट देणार आहेत.
#Live | 09-09-2024 📍वर्षा निवासस्थान, मुंबई
📹 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ – लाई https://t.co/4oS3PjsImK — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2024
”आपण उद्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंबभेट ही योजना राबवणार आहोत. यामाध्यमातून आपण घरोघरी जाऊन महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे का? याचा आढावा घ्यायचा आहे. या योजनेचा शुभारंभ उद्यापासून होईल. मी स्वतः उद्या १५ कुटुंबाना भेट देणार आहे. एखाद्या कुटुंबात लाभार्थी आहे पण त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला नसेल तर, तो लाभ कसा मिळवता येईल यासाठी मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. तसेच राज्य सरकारच्या इतर ज्या १० पेक्षा जास्त योजना आहेत. त्याचा लाभ महिलांना मिळत आहे का? याची चौकशी केली जाणार आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. nराज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी महायुती आणि महविकासआघाडी जोरदार तयारी करत आहे. जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत निर्णयाचा धडाका लावला आहे. दोन वर्षात आम्ही ६०० निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.