Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकांचा हंगाम सुरु, राज्यातील105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान 

राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल.

  • By Navarashtra Staff
Updated On: Nov 25, 2021 | 09:06 AM
निवडणुकांचा हंगाम सुरु, राज्यातील105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान 
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई-  विविध  32 जिल्ह्यांतील (32 districts in Maharashtra)105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Nagar panchayat Election program)21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.  राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली. (State Election comission)

22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी

मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल.

  • त्यासाठी1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी8 डिसेंबर 2021 रोजी होईल.
  • मतदान21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल.
  • 22डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

 

कोविड-19 संदर्भात निकषानुसार आवश्यक उपाययोजना

राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

 

सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे:

  • ठाणे- मुरबाड व शहापूर
  • पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा
  • रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)
  • रत्नागिरी- मंडणगड, दापोली
  • सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,
  • पुणे- देहू (नवनिर्मित)
  • सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी
  • सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ,
  • सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)
  • नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा,
  • धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ
  • अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी
  • जळगाव- बोदवड
  • औरंगाबाद- सोयगाव
  • जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)
  • परभणी- पालम
  • बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी
  • लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ
  • उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.
  • नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर
  • हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,
  • अमरावती- भातकुली, तिवसा
  • बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा
  • यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी
  • वाशीम- मानोरा
  • नागपूर- हिंगणा, कुही
  • वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर
  • भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर
  • गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली
  • चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा
  • गडचिरोली-एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.

 

पोटनिवडणुकांसाठीही मतदान

विविध जिल्ह्यातील सात नगरपरिषदा-नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. शिरोळ, नागभीड, जत, सिल्लोड, फुलंब्री, वानाडोंगरी आणि ढाणकी नगरपंचायतींतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका होत आहेत.

 

Web Title: Election season begins polling for 105 nagar panchayats in the state on december 21

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2021 | 09:00 AM

Topics:  

  • Maharashtra CM
  • State Election Commission

संबंधित बातम्या

स्थानिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला; मतदारयाद्यांबाबत केली जातीये ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी
1

स्थानिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला; मतदारयाद्यांबाबत केली जातीये ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.