
cow
जितेंद्र पाटील, डहाणू: संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा(law to stop cow slaughter) लागू असताना तारापूरजवळील चिंचणी खाडीनाका येथे मात्र शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही गायींची कत्तल झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे चिंचणी-तारापूर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात ६ आरोपींवर गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिली आहे.
[read_also content=”पोलिसांच्या वेषात त्यांनी चक्क घातला दरोडा, व्यापाऱ्याचे तब्बल २५ लाख लुटले https://www.navarashtra.com/latest-news/robbers-robbed-25-lakhs-by-wearing-police-uniform-in-vasai-nrsr-95876.html”]
तारापूरजवळील चिंचणी खाडीनाका येथे एका अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कत्तलखान्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गाई आणण्यात आल्याची खबर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि काही जागरूक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मध्यरात्री वाणगाव पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून एकूण ६ आरोपींना ताब्यात घेतले.
[blockquote content=”संबंधित घटनेची माहिती पोलीस यंत्रणेला लागताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपींना अटक केले. स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.” pic=”” name=”- विश्वास वळवी, पोलीस उपविभागीय अधिकारी, बोईसर, तारापूर”]
पोलिसांच्या येण्याअगोदरच काही गुरांची कत्तल करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेल्या १३ गुरांना ताब्यात घेऊन त्यांची विश्व हिंदू परिषद-बजरंग दल संचालित बोईसर येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.गोवंशाची कत्तल झालेल्या जागेवरून पोलिसांनी रक्तमिश्रित काही अवयवाचे भाग जप्त करून ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.गायींची हत्या झाल्याचा प्रकार चिंचणीमध्ये घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच चिंचणी खाड़ी नाका पोलिस चौकी जवळ काही नागरिकांनी गर्दी केली होती.
[blockquote content=”चिंचणी तारापूरमध्ये वारंवार गोहत्येच्या घटना घडत असून जिल्हा पोलीस यंत्रणा व जिल्हा यंत्रणेने गोहत्या करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. जेणेकरून गो हत्येसारख्या गंभीर घटना पुन्हा घडणार नाहीत.” pic=”” name=” – चंदन सिंग , बजरंग दल जिल्हा प्रमुख बोईसर”]
याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये देखील तारापूरमध्ये गोवंश कत्तलीचा प्रकार घडला होता.बोईसर,तारापूर आणि डहाणू परिसरात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गायी-बैल तसेच रस्त्यावरील बेवारस जनावरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात येऊन गाडीमध्ये निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेण्याच्या घटनांत मोठी वाढ झालेली दिसून येत असून याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख सुत्रधारांची पाळेमुळे खणून काढण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.