• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Eye And Jaw Failure Due To Mucormycosis The Cost Of Treatment Was Rs 1 Crore Nrat

म्युकर मायकोसिसमुळे डोळा आणि जबडा निकामी; उपचाराचा खर्च आला दीड कोटी

कोरोनातून बरे झाल्यानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस (mucormycosis) या आजारामुळे नागपुरातील एकाला तब्बल दीड कोटी रुपये (Rs 1.5 crore) उपचारासाठी (treatment) खर्च आला. मात्र इतका खर्च करूनही त्यांना एक डोळा आणि जबडा (eye and a jaw) गमवावा लागला.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 09, 2021 | 04:07 PM
म्युकर मायकोसिसमुळे डोळा आणि जबडा निकामी; उपचाराचा खर्च आला दीड कोटी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर (Nagpur). कोरोनातून बरे झाल्यानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस (mucormycosis) या आजारामुळे नागपुरातील एकाला तब्बल दीड कोटी रुपये (Rs 1.5 crore) उपचारासाठी (treatment) खर्च आला. मात्र इतका खर्च करूनही त्यांना एक डोळा आणि जबडा (eye and a jaw) गमवावा लागला. वेळेत निदान झाले नाही तर काय होऊ शकते याचे हे उदाहरण आहे.

नवीन पॉल (वय ४६) असे या रुग्णाचे नाव आहे. नवीन नागपूरला जीएसटीमध्ये कार्यरत आहेत, तर पत्नी संगीता या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत नवीन यांना १६ सप्टेंबर रोजी करोना संसर्ग झाला. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २२ दिवस उपचार करण्यात आले.

तिथे असतानाच त्यांचा एका डोळ्याखाली लाल रेघ आली होती व जबडा दुखत होता. तेथील डॉक्टारांनी डोळ्याच्या डॉक्टरांना बोलावले. मात्र त्यांनी काही विशेष नसल्याचे सांगितले. तरीही त्रास होता. त्यामुळे आठ लाख रुपये बिल भरून तेथून सुटी घेतली.

घरी आल्यावर नवीन भ्रमिष्टासारखे करायला लागले. मेंदूवर काही परिणाम झाला असेल म्हणून त्यांना धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असे एक महिना ते होते. या काळात त्यांचा एक डोळा मोठा होऊन बाहेर आला होता. मात्र तिथेही म्युकरचे निदान झाले नाही. तेथे १६ लाख रुपये भरल्यानंतर हैदराबाद येथे डोळ्यांच्या प्रसिद्ध दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तिथेही हा त्रास म्युकरमुळे असल्याचे सांगता आले नाही.

शेवटी नागपूरला पुन्हा दुसऱ्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. तिथे यांच्या डोळ्यात कसला तरी संसर्ग झाला आहे व उपचारासाठी मुंबईला हिंदुजा हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला देण्यात आला. हिंदुजामध्ये डॉक्टरांनी पाहिल्याबरोबर म्युकर असल्याचे सांगितले. तिथे नाकावाटे काळी बुरशी काढण्यात येत होती. मात्र डोळ्याचा त्रास तसाच होता.

तेथे रोज ७० हजार रुपयांचे इंजेक्शन व आठवड्याला ४२ हजार रुपयांच्या कॅप्सुल लागायच्या. २० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर ते तिथे होते. १६ लाख रुपये बिल झाले. त्यामुळे तेथून सुटी घेतली. त्यावेळी तेथील एका डॉक्टरांनी नागपूरला डॉ. अश्विनी तायडे यांचा संदर्भ दिला. त्यानुसार नागपूरच्या मेडिट्रेना रुग्णालयात दाखल करण्याचे ठरले. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांचे नेते पितांबर अण्णा यांनी रुग्णालयात दाखल करण्यासंबंधीची सर्व औपचारिकता पूर्ण करून ठेवली. त्यानंतर मुंब‌ईवरून नवीन यांना थेट मेडिट्रेनामध्ये नेण्यात आले. डॉ. मिलिंद चांगोले यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांचा एक डोळा काढला. त्यांचा वरचा जबडाही काढण्यात आला. कारण या शस्त्रक्रिया केल्या तरच त्यांचा जीव वाचू शकला असता. डॉ. तायडे यांच्यासह डॉ. चांगोले, डॉ. डहाने, डॉ. अग्रवाल आमच्यासाठी देव असल्याची भावना संगीता यांनी व्यक्त केली.

रेल्वेने दिले एक कोटी
संगीता रेल्वेत नोकरी करीत असल्याने रेल्वेने मोठे अर्थसाह्य केले. नवीन यांच्यावरील उपचारासाठी आजवर १ कोटी ४८ लाख रुपये खर्च आला. त्यापैकी तब्बल १ कोटी रुपये रेल्वेने दिले.

कुटुंबाची साथ
या कठीण प्रसंगात माझे भाऊ, बहीण, दीर, भाचे सर्वच आमच्या पाठीशी उभे झाले. मी माझे दागिने गहान ठेवले. पीएफमधील रक्कम काढली. जवळ जे होते ते सर्व उपचारासाठी लावले. नवीन यांच्या अधिकाऱ्यांनी ५ लाख रुपये दिले. या सर्वांचे खूप उपकार आहेत, अशी भावना संगीता यांनी व्यक्त केली.

Web Title: Eye and jaw failure due to mucormycosis the cost of treatment was rs 1 crore nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2021 | 04:07 PM

Topics:  

  • Hyderabad
  • Mucormycosis

संबंधित बातम्या

हैदराबादातून सुरू झालेला ७०,००० कोटींचा ‘बिर्याणी घोटाळा’ उघड; बिलिंग सॉफ्टवेअर फेरफारातून देशभरात कडक कारवाई
1

हैदराबादातून सुरू झालेला ७०,००० कोटींचा ‘बिर्याणी घोटाळा’ उघड; बिलिंग सॉफ्टवेअर फेरफारातून देशभरात कडक कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अनुराग कश्यपचा संताप! ‘The Kerala Story 2’ला ‘प्रोपगंडा फिल्म’ म्हणत दिग्दर्शकावर साधला थेट निशाणा

अनुराग कश्यपचा संताप! ‘The Kerala Story 2’ला ‘प्रोपगंडा फिल्म’ म्हणत दिग्दर्शकावर साधला थेट निशाणा

Feb 22, 2026 | 02:40 PM
राजकीय वाद पेटला! मीरा-भाईंदरचा विकास आराखडा पुन्हा रद्द? राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय

राजकीय वाद पेटला! मीरा-भाईंदरचा विकास आराखडा पुन्हा रद्द? राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय

Feb 22, 2026 | 02:37 PM
SL vs ENG : दासुन शनाकाने नाणेफेक जिंकले, श्रीलंका गोलंदाजी करणार! नजर टाका Playing 11 वर

SL vs ENG : दासुन शनाकाने नाणेफेक जिंकले, श्रीलंका गोलंदाजी करणार! नजर टाका Playing 11 वर

Feb 22, 2026 | 02:37 PM
Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू

Feb 22, 2026 | 02:33 PM
श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

Feb 22, 2026 | 02:32 PM
Global Tariff: ट्रम्पच्या टॅरिफ स्फोटाने 24 तासांत बदलले जगाचे अर्थकारण; पण भारतीय वंशाच्या वकिलांनी लावला कायद्याचा ‘असा’ सुरुंग

Global Tariff: ट्रम्पच्या टॅरिफ स्फोटाने 24 तासांत बदलले जगाचे अर्थकारण; पण भारतीय वंशाच्या वकिलांनी लावला कायद्याचा ‘असा’ सुरुंग

Feb 22, 2026 | 02:31 PM
Mangal Gochar 2026: मंगळ शनिच्या राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Mangal Gochar 2026: मंगळ शनिच्या राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Feb 22, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.