Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णाला बेवारस ठरवून पालिकेनेच केला अंत्यसंस्कार, बातमी ऐकताच नातेवाईकांना बसला धक्का

वसई विरार(Vasai Virar) महापालिकेने बेवारस म्हणून कोरोना केंद्रातून बेपत्ता(Missing from Corona center) झालेल्या ८२ वर्षीय वृद्धाच्या मृतदेहावर(Missing person dead) २० दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार केल्याचे उघड झाले आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 13, 2021 | 04:57 PM
कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णाला बेवारस ठरवून पालिकेनेच केला अंत्यसंस्कार, बातमी ऐकताच नातेवाईकांना बसला धक्का
Follow Us
Follow Us:

रविंद्र माने, वसई : कोरोना केंद्रातून बेपत्ता(Missing from Corona center) झालेल्या ८२ वर्षीय वृद्धाचा तपास लागला असून वसई विरार(Vasai Virar) महापालिकेने बेवारस म्हणून त्यांच्या मृतदेहावर(Missing person dead) २० दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार केल्याचे उघड झाले आहे.

वसई- वीर सावरकर नगर नवकला अपार्टमेंट मध्ये राहणारे रामचंद्र दास ( वय वर्षे ८२ ) यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या नातेवाईकांनी २२ एप्रिल २०२१ रोजी त्यांना वसई विरार महापालिकेच्या वालीव येथील वरूण इंडस्ट्रीज कोविड सेंटरमध्ये त्यांना दाखल केले होते.त्यांचे क्वारंटाईनचे १४ दिवस ५ मे रोजी पूर्ण झाल्याने दास यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी कोविड सेंटरला पोहोचले. तेव्हा त्यांना धक्काच बसला.

रामचंद्र दास सेंटरमध्ये नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यांना तेथे असलेले दोन मृतदेह दाखविण्यात आले. पण त्यातही दास नव्हते. त्यामुळे नातेवाईकांना परत पाठवून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.दोनतीन वेळा फेऱ्या मारूनही त्यांना दाद देण्यात आली नाही.

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांनी या प्रकरणी आवाज उठवल्यावर महापालिकेची धावपळ सुरु झाली. महापालिकेमार्फत दास यांच्या बेपत्ता होण्याची वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

[blockquote content=”रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर कोरोना सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी त्यांना बाहेर नेण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलचे फुटेज तपासल्यावर तेथे त्यांना दाखल करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.” pic=”” name=” – विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव”]

वालिव पोलसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून रामचंद्र दास यांचा शोध लावला.पण दुर्दैवाने दास हयात नव्हते.त्यांच्या मृतदेहावर २६ एप्रिललाच पालिकेने बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केल्याचे उघड झाले. दास यांची तब्येत जास्त खराब झाल्याने त्यांना पालिकेच्या तुळींज रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचारादरम्यान तेथेच त्यांचा मृत्यू झाला.पण रामचंद्र दास यांचे नातेवाईक गोराचंद मुखर्जी यांना कळविण्यात आले नाही.

[read_also content=”तारापूर एमआयडीसीमध्ये केमिकल टँकरला लागली आग, अग्नीशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु https://www.navarashtra.com/latest-news/chemical-tanker-fire-at-tarapur-midc-nrsr-128358.html”]

या घटनेमुळे महापालिकेचा आरोग्य विभागातील भोंगळ कारभार उघड झाला आहे. दास यांना वसईतील कोविड सेंटरमधून नालासोपारातील पालिकेच्या तुळींज हॉस्पिटलमध्ये नेताना ट्रान्सफर पेपर तयार करण्यात आले नव्हते. तसेच तुळींज हॉस्पिटलमध्ये दाखल करताना तशी नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

[blockquote content=”सीसीटीव्ही फुटेज आणि अंत्यसंस्कारापुर्वी फोटो काढण्यात आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. ” pic=”” name=”- सतीश लोखंडे, पालिका आयुक्त”]

दास यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्यापासूनचे सीसीटीवी फुटेज तपासल्यावर ही माहिती उजेडात आली.त्यांची पालिकेच्या रुग्णालयात नोंद नसल्यामुळे नातेवाईकांपर्यंत पोहोचता आले नाही परिणामी बेवारस म्हणून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

Web Title: Final rites done by vasai virar corporation considering corona patients have no where abouts nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2021 | 04:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.