अकोला (Akola). एका करारनाम्यावर चार्टर्ड अकाउंटंटची (chartered accountant) बनावट स्वाक्षरी (the signature) करून करारनामा जिल्हा व सत्र न्यायालयात (the District and Sessions Court) सादर करून न्यायालयाची दिशाभूल केली. गोपाल हाडोळे याची पोलीस कोठडी संपल्याने रामदास पेठ पोलिसांनी (Ramdas Peth police) त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.
[read_also content=”चंद्रपूर/ पिस्तूलांचा फोटो सोशल अकाउंटवर टाकला; पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात https://www.navarashtra.com/latest-news/posted-a-photo-of-the-pistol-on-a-social-account-police-arrested-the-youth-nrat-161590.html”]
सिंधी कॅम्प येथील रहिवासी चार्टर्ड अकाउंटंट विनय थावरानी यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गोपाल हाडोळेने न्यायालयात बनावट करारनामा सादर केला होता. या करारनाम्यावर चार्टर्ड अकाउंटंट विनय थावरानी यांच्या स्वाक्षऱ्या खोट्या असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर विनय थावरानी यांनी नागपूर येथील हस्ताक्षरतज्ज्ञांकडून स्वाक्षरीची तपासणी केली असता गोपाल होडोळेने सादर केलेल्या करारनाम्यातील विनय थावरानी यांची स्वाक्षरी बनावट असल्याचा अहवाल या तज्ज्ञांनी दिला
होता.
त्याआधारे विनय थावरानी यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल हाडोळे त्याची पत्नी प्रतिभा हाडोळे व सचिन मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. रामदास पेठ ‘पोलिसांनी गोपाल हाडोळे यास अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.