Get rid of the luncheon! Khichdi is not cooked in the schools of the district
गोंदिया : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून १५ मार्चपासून मध्यान्ह भोजन सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले. यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडूनही संबंधित पुरवठादारांना तसे निर्देश देण्यात आले. मात्र, पुरवठाराकडून शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली असून मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ व कडधान्याचा साठा अद्यापपर्यंत जिल्ह्यातील कुठल्याच शाळेत पोहोचलेला नाही. त्यामुळे ठरावीक तारीख लोटूनही शाळांमध्ये खिचडी शिजली नाही. परिणामी दोन वर्षांनंतर शालेय पोषण आहार अंतर्गत शाळांमधून सुरू होणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या मुहूर्तालाच खोड़ा बसला आहे.
[read_also content=”शेवटच्या दिवसापर्यंत पाच हजारांवर अर्ज, आरटीईच्या मोफत २५ टक्के जागांची २१ मार्चनंतर सोडत https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/five-thousand-applications-till-last-day-leaving-after-25th-march-for-25-free-rte-seats-nraa-256135.html”]
कोरोनामुळे मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांना शाळांमधून देण्यात येणारे मध्यान्ह भोजन बंद होते. त्याऐवजी विद्यार्थ्यांना धान्य देण्यात येत होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले. शाळेतील मध्यान्ह भोजनावरील निर्बंध उठवून विद्यार्थ्यांना १५ मार्चपासून शाळेत मध्यान्ह भोजन देण्यात यावे, असे आदेश शासनाच्या शिक्षण संचालनालयाने दिले. यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून ९ मार्च रोजी सर्व शाळांना व पुरवठादाराला निर्देश देण्यात आले. त्यानुसार शाळांनी तयारी केली होती. या अनुषंगाने सोमवार १४ मार्च सायंकाळपर्यंत शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र १५ मार्च ही तारीख लोटूनही जिल्ह्यातील शाळेत तांदूळ, कडधान्य अथवा धान्यादी मालाचा साठा पोहोचला नाही. त्यामुळे मंगळवारपासून सुरु होणाऱ्या मध्यान्ह भोजनाला सुरुवातच झाली नाही.
[read_also content=”थकीत वीजबिल वसुली प्रकरणी अकोट सत्र न्यायालयाने केली आरोपीची कारागृहात रवानगी https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/accused-sent-to-jail-by-akot-sessions-court-in-recovery-of-overdue-electricity-bill-nraa-255872.html”]
जिल्ह्यात इयत्ता १ ते ८ वीपर्यंतच्या १ हजार ३४३ शाळा असून यात मध्यान्ह भोजनाचा लाभ घेणारे पहिली ते पाचवीपर्यंतचे ६६ हजार तर सहावी ते आठवी पर्यंतचे ५० हजार ८३२ असे १ लाख १६ हजार ८३२ विद्यार्थी आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना शाळांकडून शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्ह भोजन देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मार्च व एप्रिल या दोन महिन्यातील ४३ दिवसाचा कालावधी ठरवून तसा तांदूळ व मटकी, तुरदाळ, बाटाणा आदी कडधान्याचा पुरवठा करण्याचे आदेश संबंधित पुरवठादार संस्थेला देण्यात आले होते. मात्र, संदर संस्थेकडून या धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी शाळांमध्ये मध्यान्ह भोजन शिजविण्यातच आले नसून विद्यार्थ्यांना घरच्या डब्यावर भागवावे लागत आहे.
[read_also content=”होळी खेळताना खबरदारी घ्या, महावितरणचे नागरिकांना आवाहन https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/msedcl-appeals-to-citizens-to-be-careful-while-playing-holi-nraa-256121.html”]
केवळ ३९ पैशांची वाढ
शालेय पोषण आहार अंतर्गत पूर्वी खाद्यतेल शासनामार्फत पुरविले जात होते. परंतु, अनुदानात प्रतिदिन प्रतिविद्यार्थी ३९ पैशांची वाढ करून शाळांनी खाद्यतेल खरेदीची अट शासनाकडून टाकण्यात आली आहे. ही बाब परवडणारी नसून मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांकडून यावर तोडगा काढण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.