Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील बस प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; लॉकडाऊनपूर्वीच्या पीएमपी पासला मिळणार मुदतवाढ, पण…

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी अनेक नोकरदार, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसह नियमित प्रवाशांनी पास केंद्रावरून पीएमपीचे बस पासेस काढलेले आहेत. परंतु, ३ एप्रिल रोजी अचानक राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अशा बस पासधारकांना बस पासचा वापर करता आलेला नाही.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 12, 2021 | 11:26 AM
PMPML Bus

PMPML Bus

Follow Us
Follow Us:

पुणे : मागील दोन महिन्यांपासून पुण्यासह महाराष्ट्रात लॉकडाऊनची (Lockdown) अंमलबजावणी करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळातील पुण्यातील बससेवा (PMP) बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक पीएमपी पास धारकांना (PMP Pass) बससेवाचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे त्यांचं काही प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी ३ एप्रिलपूर्वी पीएमपी बसचा पास काढलेल्या प्रवाशांना मुदतवाढ (PMP pass extension) देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहारातील हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

खरंतर, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी अनेक नोकरदार, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसह नियमित प्रवाशांनी पास केंद्रावरून पीएमपीचे बस पासेस काढलेले आहेत. परंतु, ३ एप्रिल रोजी अचानक राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अशा बस पासधारकांना बस पासचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी पास काढलेल्या नागरिकांना मुदत वाढ देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पण त्यासाठी प्रवाशांना पास केंद्रांवरून जाऊन आपल्या पासची मुदतवाढ करून घ्यावी लागणार आहे.

[read_also content=”सावधान! रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर न पडण्याचं महापालिकेचं आवाहन https://www.navarashtra.com/latest-news/mumbairains-red-alert-in-mumbai-on-13-june-and-14-june-and-heavy-rain-warning-nrvb-141289.html”]

सध्या महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ६ जूनपासून पीएमपी सेवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांना लॉकडाऊनच्या काळात पासचा लाभ घेता आला नाही. अशा प्रवाशांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वारगेट, हडपसर बसस्थानक, मनपा, डेक्कन, पुणेस्टेशन (मोलेदीना), वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपरी चौक (लोखंडे सभागृह), पिंपळे गुरव, भोसरी (शिवाजी चौक) आळंदी, सासवड, उरूळीकांचन व राजगुरूनगर आदी पास केंद्रांवर पासची मुदत वाढवून मिळणार आहे.

त्यामुळे पास धारकांनी २० जूनपर्यंत संबंधित पास केंद्रात जाऊन आपल्या पासची मुदतवाढ करून घ्यावी लागणार आहे. कारण २० जूननंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. पास धारकांनी अर्ज केल्यानंतरचं त्यांना मॅन्युअल आणि मी-कार्डची मुदत वाढवून मिळणार आहे. त्यासाठी पासधारकांनी अर्ज आणि मूळ पाससह संबंधित पास केंद्रातून मुदत वाढवून घ्यावी, असं आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

[read_also content=”पाणीपुरीत वेडिंग रिंग ठेवून केला प्रेमाचा इजहार ; अनोख्या प्रकारावर तिच्यासह नेटकरीही झाले फिदा https://www.navarashtra.com/latest-news/to-propose-his-girlfriend-a-person-put-wedding-ring-in-paani-puri-goes-viral-on-social-media-nrvb-141001.html”]

good news for pune pmp bus passengers pass issued before lockdown will get extension

Web Title: Good news for pune pmp bus passengers pass issued before lockdown will get extension nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2021 | 11:26 AM

Topics:  

  • pass
  • Pune

संबंधित बातम्या

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
1

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.