Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांना दिली महत्त्वाची माहिती

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉल क्लिनिककडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना होत असलेला त्रास आता कमी झाला आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 03, 2026 | 12:39 PM
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांना दिली महत्त्वाची माहिती

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांना दिली महत्त्वाची माहिती

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
  • डिस्चार्ज कधी मिळणार?
  • डॉक्टरांना दिली महत्त्वाची माहिती
Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. छातीत सौम्य वेदना (Pleuritic Pain) जाणवत असल्याने नियमित आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय देखरेखीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली शरद पवार यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यांना होत असलेला त्रास आता कमी झाला असून, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे उद्यात्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी

शरद पवार महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धाराशिव येथे असताना दुपारच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी आपला दौरा मध्येच स्थगित केला आणि तातडीने पुण्याकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ के. ग्रँट यांनी यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात शरद पवार यांच्या प्रकृतीची डॉक्टरांचे पथक नियमित काळजी घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीचा आढावाही घेण्यात आला आहे.

प्रकृतीत सुधारणा, त्रास कमी झाला

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना जाणवत असलेला त्रास आता कमी झाला आहे. त्यांची एकूण प्रकृती चांगली असल्याने त्यांना उद्या (4 नोव्हेंबर 2026) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. मात्र, डिस्चार्जबाबतचा अंतिम निर्णय डॉक्टरांच्या वैद्यकीय निरीक्षणानंतर घेतला जाणार आहे.

रुबी हॉल क्लिनिककडून अधिकृत निवेदन

डॉ. पुरवेझ के. ग्रँट यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांचे पथक शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात आला असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना होत असलेला त्रास कमी झाला आहे आणि त्यांची प्रकृती चांगली आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत ही माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

Sharad Pawar Drought Tour : शरद पवारांचा दुष्काळग्रस्तांसाठी मोठा निर्णय! तुळशी गावात पोहोचताच केली ५० लाखांची मदत

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरद पवार यांची प्रकृती सध्या कशी आहे?

    Ans: रुबी हॉल क्लिनिकच्या अधिकृत निवेदनानुसार, शरद पवार यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. त्यांना होत असलेला त्रासही कमी झाला आहे.

  • Que: शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार आहे?

    Ans: डॉक्टरांच्या माहितीनुसार, शरद पवार यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

  • Que: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती कोणी दिली?

    Ans: रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ के. ग्रँट यांनी अधिकृत निवेदनातून ही माहिती दिली.

Web Title: Sharad pawar health update ruby hall clinic discharge likely 4 nov 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • Pune
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar Health Update:  शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी
1

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी

Pratap Sarnaik: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार
2

Pratap Sarnaik: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार

Sharad Pawar News: दिल्लीतील आंदोलनापेक्षा राज्यातील दुष्काळ निवारण आमचे प्राधान्य! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

Sharad Pawar News: दिल्लीतील आंदोलनापेक्षा राज्यातील दुष्काळ निवारण आमचे प्राधान्य! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar Drought Tour : शरद पवारांचा दुष्काळग्रस्तांसाठी मोठा निर्णय! तुळशी गावात पोहोचताच केली ५० लाखांची मदत
4

Sharad Pawar Drought Tour : शरद पवारांचा दुष्काळग्रस्तांसाठी मोठा निर्णय! तुळशी गावात पोहोचताच केली ५० लाखांची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.