Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा शहर आता एका क्लिकवर ! होणार गुगल मॅपिंग

सातारा शहरातील शासकीय, खासगी मिळकती, तसेच रस्‍ते, बागा व इतर जागांचे शासनाच्‍या धोरणानुसार जीआयएस मॅपिंग होणार

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 02, 2021 | 04:13 PM
सातारा शहर आता एका क्लिकवर ! होणार गुगल मॅपिंग
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा शहरातील शासकीय, खासगी मिळकती, तसेच रस्‍ते, बागा व इतर जागांचे शासनाच्‍या धोरणानुसार जीआयएस मॅपिंग होणार असून, त्यासाठीची तयारी पालिकेने केली आहे. हे मॅपिंग पूर्ण झाल्‍यानंतर शहरातील विविध मालमत्ता, जागा, रस्‍ते व इतर मिळकतींची माहिती शासनाबरोबरच नागरिकांना एका क्‍लिकवर उपलब्‍ध होणार आहे.

सातारा शहराचा विस्‍तार दिवसेंदिवस वाढत असून, नुकत्‍याच झालेल्‍या हद्दवाढीनंतर शाहूपुरी, विलासपूर या ग्रामपंचायती, तसेच पिरवाडी, शाहूनगर, विसावा नाका आदी उपनगरे पालिकेच्‍या हद्दीत आली आहेत. हद्दवाढीमुळे शहराचा भौगोलिक विस्‍तार वाढल्‍याने ‍त्याठिकाणची प्रशासकीय सुविधा सुरळीत ठेवण्‍याबरोबरच नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्‍यावर पालिकेला जास्‍तीचे लक्ष द्यावे लागत आहे.

शहराच्‍या विविध भागांत असणाऱ्या शासकीय, तसेच खासगी मिळकती, बागा, रस्‍ते, गटार व इतर सुविधांचे आराखडे, नकाशे सध्‍या कागदी स्वरूपात पालिकेकडे, तसेच शासनाच्‍या इतर यंत्रणांकडे उपलब्‍ध आहेत. आराखडे, नकाशे हाताळणीवेळी त्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्‍याने ते मिळवताना पालिकेस, तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना नेहमीच करावा लागतो.

हाताळणीवेळी आराखडे, नकाशांच्‍या झालेल्‍या नुकसानीमुळे अचूक माहिती मिळण्‍यात अडचणी येऊन त्‍याचा परिणाम शासकीय योजनांच्‍या अंमलबजावणीवर होत असतो. हे टाळण्‍यासाठी शासनाने सर्वच शहरे, ग्रामपंचायतींमधील मिळकतींचा जीआयएस मॅपिंग करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा पालिकेच्‍या हद्दीतील शासकीय मिळकती, खासगी मिळकती, बस स्‍थानके, मैदाने, रिकाम्‍या जागा, रस्‍ते, गटारे, ओढे, बागा यांचे जीआयएस मॅपिंग करण्‍यात येणार आहे. हे काम शासनाने एका संस्‍थेला दिले असून, त्‍यांना मॅपिंगसाठी आवश्‍‍यक असणारे जुने नकाशे, आराखडे देण्‍यासाठीची यंत्रणा सातारा पालिकेने तयार केली आहे.

हे काम पूर्ण झाल्‍यानंतर शासकीय मिळकती, रस्‍ते व इतर ठिकाणी झालेले अतिक्रमण व इतर बाबी पालिकेच्‍या निदर्शनास येण्‍यास मदत होण्‍याबरोबरच नागरिकांचा नकाशे, आराखडे मिळवण्‍यासाठीच्‍या होणाऱ्या श्रमाची बचत होणार आहे.

जीआयएस मॅपिंगची तयारी पूर्ण

शहरातील मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्‍यासाठीची तयारी सातारा पालिकेने केली आहे. हे काम शासनाने नेमलेली त्रयस्‍थ यंत्रणा करणार असून, त्‍यांना आवश्‍‍यक असणारी माहिती, आराखडे, नकाशे पालिकेकडून पुरविण्‍यात येणार आहेत. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, हे काम प्रत्‍यक्षात लवकरच सुरू होईल.

– अभिजित बापट, मुख्‍याधिकारी, सातारा नगरपालिका.

Web Title: Google mapping of satara city soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2021 | 04:13 PM

Topics:  

  • Google Mapping

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.