Google Maps च्या या फीचरने सॉल्व्ह केली मोठी मर्डर मिस्ट्री, जाणून घ्या कसा वापरायचा
जगातील सर्वात लोकप्रिय नॅव्हिगेशन ॲपमध्ये गुगल मॅप्स (Google Maps) या ॲपचा प्रामुख्याने समावेश होतो. एखाद्या लोकेशनवर पोहचण्यापूरताच त्याचा वापर करता येत नाही तर दुसऱ्या कुणाचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठीही याचा वापर केला जातो. इथे युजर्सना अनेक वेगवगेळे फीचर्स पुरवले जातात. आज मात्र आपण याच्या एका अनोख्या फिचरविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने पोलिसांना एक मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करण्यास मदत झाली होती. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
गुगल (Google) मॅपच्या फिचर एक मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करण्यात पोलिसांना मदत मिळाली आहे. या फीचरच्या माध्यमातून मर्डर करणाऱ्याची इमेज पुराव्यासह कॅप्चर करण्यात आली, ज्याच्या मदतीने पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली. ही घटना उत्तर स्पेन घडून आली. या प्रकरणाने सर्वांनाच हादरवून ठेवले. क्युबातील एका छोट्या गावातील 32 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी एका पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. गुगल मॅप्सच्या स्ट्रीट व्यू फिचरवरून कॅप्चार केलेल्या फोटोजने मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह करण्याचे काम केले.
WhatsApp ने जारी केला कामाचा फिचर, आता थेट कॅमेऱ्यातून स्कॅन होतील कागदपत्रे
गुगलने 25 मे 2007 रोजी स्ट्रीट व्यू फिचर सुरू केले. या 17 वर्ष जुन्या वैशिष्ट्यात अलीकडच्या काळात अनेक मोठे अपग्रेड झाले आहेत. 2021 मध्ये, स्ट्रीट व्यू फिचरमध्ये एक मोठे अपग्रेड करण्यात आले होते, त्यानंतर या फिचरद्वारे तुमच्या परिसराचे चित्र देखील कॅप्चर केले जाऊ शकते. गुगल मॅप्सची ही सुविधा अँड्रॉइड (Android), आयओएस (iOS) आणि वेब युजर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरद्वारे एखाद्या ठिकाणाची खरी प्रतिमा पाहता येते. स्पेनच्या या प्रकरणातही, पोलिसांना स्ट्रीट व्ह्यूच्या या फिचरद्वारे खरी प्रतिमा मिळाली, ज्याने मोठ्या खुनाच्या रहस्याचा पुरावा म्हणून काम केले.
कसा करावा वापर
तुम्ही नकाशातील लोकेशनवर टॅप करताच, तुम्हाला स्ट्रीटची रिअल इमेज दिसू लागेल. जरी, ही रिअल टाइम इमेज नाही, परंतु तुम्हाला त्या ठिकाणाची माहिती मिळते.