इंस्टाग्राम हे आजच्या काळात एक सर्वाधिक वापरले जाणारे आणि लोकप्रिय असे ऑनलाईन फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर आतापर्यंत जगभारतील लाखो युजर्स जोडले गेले आहेत. इंस्टाग्राम आपले प्लॅटफॉर्म सुधारण्यासाठी नवनवीन फीचर्स जोडत आहे. त्यातच आता कंपनी एका फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये मित्रांच्या स्टोरी हायलाइट्स पुन्हा युजर्ससमोर आणल्या जातील. हे फीचर अशा लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, जे आपल्या मित्रांच्या इंस्टाग्राम स्टोरी वेळेवर पाहू शकत नाहीत. सध्या, इंस्टाग्राम काही युजर्ससह या फिचरची टेस्टिंग करत आहे आणि येत्या काही दिवसांत फिचर रोल आउट देखील केले जाऊ शकते.
स्टोरीज (Stories) हे देखील इंस्टाग्रामवरील एक खास फिचर आहे, जिथे युजर्स कोणताही फोटो किंवा छोटा व्हिडिओ शेअर करू शकतात. ही स्टोरी 24 तासांसाठीच असते आणि 24 तासांनंतर ती आपोआप गायब होते. युजर्स इच्छित असल्यास, ते ही स्टोरी त्यांच्या प्रोफाइलवर ‘हायलाइट’ (Highlight) म्हणून सेव्ह करू शकतात. एकदा हायलाइट्समध्ये सेव्ह केल्यावर, या स्टोरी हटवल्या जात नाहीत आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा त्या पाहता येतात.
तुमच्या नावावर कोणते बनावट Sim तर वापरले जात नाही? त्वरित असे करा चेक अन् ब्लॉक
कुठे दिसेल स्टोरी हायलाइट?
इंस्टाग्राम (Instagram) आता नवीन फीचरमध्ये स्टोरीज ट्रेच्या शेवटी या स्टोरी हायलाइट्स दाखवेल. स्टोरीज ट्रे, म्हणजे ते ठिकाण जिथे तुम्ही तुमच्या मित्रांच्या स्टोरीज पाहता. येथे हे देखील नमूद करणे आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व मित्रांच्या स्योरी पाहिल्या असतील तेव्हाच तुम्हाला स्टोरी हायलाइट (Story Highlights) दिसतील. इंस्टाग्रामकडे तुम्हाला दाखवण्यासाठी कोणतीही स्टोरी शिल्लक नसेल, तेव्हा ते तुम्हाला स्टोरीज हायलाइट दाखवेल.
तुमच्या फोनमध्ये करा ही लहान Settings, चुकूनही येणार नाही Spam Calls
या फीचरचा फायदा काय?
हे फिचर इंस्टाग्रामच्या (Instagram) एका मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे, ज्यामध्ये ते युजर्सना त्यांच्या मित्र आणि कुटुंबाची कंटेंट प्रथम दर्शवू इच्छित आहे. सध्या प्लॅटफॉर्मचा फोकस रील (Reel) आणि अल्गोरिदम (Algorithm) आधारित शिफारसींवर आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा मित्रांची स्टोरी मिस होऊन जाते. आपल्या ही स्टोरी पाहायची असली तरी ती आपल्याला पाहता येत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी, एका नवीन फिचरची टेस्टिंग केली जात आहे. टेस्टिंगपासून ते रोल आउटपर्यंत यात बराच वेळ लागू शकतो.