व्हॉट्सॲपवर आतापर्यंत जगभरातील हजारो युजर्स जोडले गेले आहेत. हे एक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येत असत. त्यातच आता कंपनी पुन्हा एकदा युजर्सच्या कामाचे असे एक अद्भुत फिचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, या फिचरवर काम सुरु असून लवकरच हे युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल.
मेटाचा (Meta) लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने iOS युजर्ससाठी आता एक अद्वितीय इन-ॲप स्कॅनिंग फिचर (In-app scanning feature) जारी केले आहे. हे नवीन फिचर iOS डिव्हाइसेसवरील WhatsApp साठी नवीनतम अद्यतनाचा (आवृत्ती 24.25.80) भाग आहे. या फीचरद्वारे यूजर्स ॲपच्या डॉक्युमेंट शेअरिंग मेनूमधून थेट डॉक्युमेंट स्कॅन करू शकतात. यासह, युजर्सना यापुढे थर्ड-पार्टी स्कॅनिंग टूल्सची गरज भासणार नाही आणि यामुळे युजर्सचे सहज होऊ शकेल.
हळूहळू युजर्सना मिळणार नवीन फिचर
नवीनतम अपडेटच्या चेंजलॉगमध्ये WABetaInfo द्वारे ॲप-मधील स्कॅनिंग फिचर प्रथम पाहिले गेले. WABetaInfo हे एक प्लॅटफॉर्म आहे जे WhatsApp अपडेट्सचा मागोवा घेते. हे फिचर हळूहळू आणले जात आहे, येत्या आठवड्यात ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. हे साधन कम्युनिकेशन आणि डॉक्यूमेंट एक्सचेंज करण्यासाठी एक कॉम्प्रिहेंसिव प्लॅटफॉर्म म्हणून व्हॉट्सॲपची कॅपेबिलिटी वाढविण्यासाठी डिझाइन केले आहे.
अशाप्रकारे नवीन फिचरचा वापर करता येईल
हे फिचर वापरण्यासाठी, तुम्हाला डॉक्यूमेंट शेअरिंग मेनू उघडावा लागेल आणि डेडिकेटेड ‘स्कॅन’ पर्याय निवडावा लागेल. डॉक्यूमेंटची इमेज कॅप्चर करण्यासाठी हे तुमच्या डिव्हाइसचा कॅमेरा एक्टिव्ह करेल. स्कॅन पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्कॅनला प्रीव्यू करू शकता आणि एडजस्ट करू शकता. येथे ॲप ऑटोमॅटिक मार्जिनची माहिती मिळते. तथापि, येथे युजर्सना ऑप्टिमल फ्रेमिंगआणि क्लॅरिटीसाठी मॅन्युअल पद्धतीने एडजस्टमेंटची सुविधा देखील मिळेल. एकदा कन्फर्म झाल्यानंतर, तुम्ही ते त्वरित व्हाट्सएपवरील चॅट/ग्रुपमध्ये शेअर करू शकता.
तुमच्या नावावर कोणते बनावट Sim तर वापरले जात नाही? त्वरित असे करा चेक अन् ब्लॉक
हे आहेत फायदे
या नवीन फीचरमुळे यूजर्सला आता थर्ड पार्टी ॲप्सची गरज भासणार नाही. या नवीन फीचरचा विशेषत: ज्यांना डॉक्युमेंट पटकन शेअर करायचे आहे त्यांना फायदा होईल. डॉक्यूमेंट क्लियर आणि रिडेबल आहेत याची खात्री करण्यासाठी WhatsApp ने स्कॅन गुणवत्ता ऑप्टिमाइझ केली आहे, ज्यामुळे ते पर्सनल आणि प्रोफेशनल वापरासाठी आणखी उपयुक्त बनले आहे. सध्या हे फिचर फक्त काही iOS युजर्ससाठी उपलब्ध आहे. परंतु येत्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने अधिक युजर्सपर्यंत विस्तारित केले जाण्याची अपेक्षा आहे.