मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त (दि. ६ जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून पत्रकार बांधवांना तसेच समस्त नागरिकांना ‘पत्रकार दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
समस्त पत्रकार बांधवांना मराठी ‘पत्रकार दिना’च्या शुभेच्छा! pic.twitter.com/KBmMDqn0Ha
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 6, 2021
दरम्यान मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान असलेल्या सिंधदूर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले येथील समारकाची व परिसरातील रस्ते दुरुस्तीचे कामे तातडीने आणि दर्जेदार करणयात यावीत त्यासाठीचा निधी जिल्हा नियोजन निधीतून खर्च करण्यात यावा. स्मारकाची जागा आचार्य बाळशास्त्रींच्या वारसांच्या व संबधितांच्या सहमतीने शासनाच्या नावे करुन घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठकीत काल दिले.